Indian Former Cricketer Zaheer Khan: झहीर खान (Zaheer Khan) हा केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील महान वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. झहीर खानने 2011 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात 9 सामन्यात 21 बळी घेत भारताला विश्वविजेते बनवण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 2 महत्त्वाचे बळी घेत भारतीय संघाच्या विजयातही योगदान दिले होते. ऑक्टोबर 2000 मध्ये त्याने भारतासाठी पदार्पण केले. पण फार कमी लोकांना माहिती असेल की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी खानने दुसऱ्या देशासाठीही क्रिकेट खेळले होते.
स्कॉट स्टायरिस, झहीर खान आणि ब्रेट ली जिओ सिनेमाच्या एका शोमध्ये चर्चा करत होते, त्याच दरम्यान स्टायरिसने झहीर खानबद्दल धक्कादायक खुलासा केला. स्टायरिसने आठवण करून दिली की झहीर खान ऑस्ट्रेलियासाठी पहिला सामना खेळला होता आणि जेव्हा झहीर खानला ते आठवले तेव्हा तो देखील हसायला लागला. स्टायरिसने सांगितले की, तो पहिल्या सामन्यात झहीरविरुद्ध खेळला होता. स्कॉट स्टायरिसने सांगितले की, झहीर खान ऑस्ट्रेलियाकडून खेळत होता, ज्याचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होता. न्यूझीलंडचा क्रिकेटर स्कॉट स्टायरिस म्हणाला की, हा माझा अपमान आहे, कारण ऑस्ट्रेलियात जन्माला येऊनही मी या देशासाठी खेळू शकलो नाही.
झहीर खान ऑस्ट्रेलियाकडून का खेळला?
या शोमध्ये ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रेट ली देखील उपस्थित होता. ब्रेट लीने झहीर खानला विचारले की तो ऑस्ट्रेलियाकडून खेळला हे खरे आहे का? यावर झहीर खानने उत्तर दिले की, "त्या काळात अकादमी ॲडलेडमध्ये असायची, पण नंतर ती ब्रिस्बेनला हलवण्यात आली. त्या दौऱ्यात मायकल क्लार्कही खेळत होता आणि मीही त्याच्यासोबत खेळलो." ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना होता, ज्यामध्ये झहीर खानने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते.
पाहा संपूर्ण व्हिडीओ-