BCCI On New Toss Rule नवी दिल्ली: भारतातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये लवकरच मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाणेफेक बंद करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमधून टॉस पूर्णपणे बंद करण्यासंदर्भात पावलं टाकणार असून प्रायोगिक पातळीवर याचा प्रयोग सीके नायुडू ट्रॉफीत केला जाऊ शकतो. बीसीसीआयनं नियम बदलल्यास पाहुण्या संघाला बॉलिंग आणि बॅटिंग करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असेल. काही संघ त्यांना फायदेशीर ठरेल अशी खेळपट्टी बनवून त्याचा फायदा घेत असल्याचं समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात येऊ शकतो. आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर त्याबद्दल फेरविचार देखील केला जाऊ शकतो.
बीसीसीआय कोणते बदल करणार?
नाणेफेक बंद करण्याशिवाय बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटचं वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे. यामुळं दोन देशांतर्गत मॅचसाठी अधिक वेळ उपलब्ध होईल. गेल्या वर्षी काही संघांच्या कर्णधारांनी दोन मॅचेसमधील कालावधी वाढवण्याची मागणी केली होती. जय शाह यांनी यासंदर्भात माहिती दिल्यानंतर बीसीसीआयकडून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. जय शाह म्हणाले की सीके नायुडू ट्रॉफीतून टॉस हटवला जाईल. याशिवाय पाहुण्या संघाकडे पहिल्यांदा बॅटिंग करणार की बॉलिंग याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार असेल. सीके नायुडू ट्रॉफी पासून नवी गुणपद्धती देखील लागू करण्यात येणार आहे.
आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियम बंद होणार?
बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमधील नियमांमधील बदलांसह आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियमावर देखील मोठा निर्णय घेऊ शकते. इम्पॅक्ट प्लेअर नियम 2024 च्या आयपीएलमध्ये लागू असून या नियमाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.त्यामुलं बीसीसीआय याबाबत देखील मोठा निर्णय घेईल. बीसीसीआय इम्पॅक्ट प्लेअर नियम रद्द देखील करेल.
जय शाह यांनी इम्पॅक्ट प्लेअर नियम प्रायोगिक तत्वावर लागू केला होता अशी माहिती दिली. आता या नियमावर विचार करण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले. त्यामुळं बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमध्ये टॉस बंद करणे, आयपीएल इम्पॅक्ट प्लेअर नियम रद्द करण्याबाबत निर्णय कधी घेणार हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या :