IPL 2024 CSK vs RR MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएल 2024 मधील आज घरच्या मैदानावर हंगामातील शेवटचा सामना खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत (RR) होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईने चाहत्यांना सामन्यानंतर मैदानावर थांबण्याची खास विनंती केली आहे, ज्याचा संबंध चाहते एमएस धोनीच्या आयपीएल निवृत्तीशी जोडत आहेत. चेन्नईच्या या घोषणेनंतर अनेक चाहते भावूकही झाल्याचे पाहायला मिळत आहे.
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नईचा राजस्थान विरुद्ध सामना होणार आहे. चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर चेन्नईचा हा शेवटचा सामना असेल. सामन्यापूर्वी, चेन्नईने सोशल मीडियावर कॅप्शनसह एक पोस्ट जारी केली, "सुपर चाहत्यांना खेळानंतर येथे थांबण्याची विनंती आहे!" पुढे लिहिले होते, "तुमच्यासाठी काही खास येत आहे." याशिवाय पोस्टरमध्ये चाहत्यांना सामना संपल्यानंतर थांबण्याची विनंतीही करण्यात आली होती.
चेन्नईने ही पोस्ट शेअर करताच लोकांनी याला टीमचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या निवृत्तीशी जोडण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्याने लिहिले की, "आज मी नक्कीच रडणार आहे." दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, "हे आणखी भयानक आहे." एका युजर्सने धोनीचे काही फोटो शेअर करत लिहिले, "याबद्दल धन्यवाद." आणखी एका युजर्सने विचारले की, "हा धोनीचा शेवटचा सामना असेल का?"
आयपीएल 2024 मधील धोनीची कामगिरी-
धोनीने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या बॅटमधून अनेक षटकार आणि चौकार आले, ज्याने चाहत्यांचे मनोरंजन केले. धोनीने चालू मोसमात आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 68 च्या सरासरीने आणि 226.67 च्या स्ट्राइक रेटने 136 धावा केल्या आहेत. त्याने 11 चौकार आणि 12 षटकार लगावले आहेत.
चेन्नई सुपर किंग्सची Playing XI:
रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (c), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश तिक्षणा
राजस्थान रॉयल्सची Playing XI:
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल