IND Vs ENG : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियावर सध्या कोरोनाचं सावट असलेलं पाहायला मिळत आहे. कसोटी मालिकेपूर्वी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत एका भारतीय खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. अशातच कोरोना संसर्ग झालेल्या भारतीय खेळाडूचं नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील एका सिनिअर खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. अशातच खेळाडूला क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. तसेच खेळाडूच्या संपर्कात आल्यामुळे इतर खेळाडूंनाही क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. 


इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, ज्या खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो खेळाडू सध्या होम क्वॉरंटाईन आहे. हा खेळाडू काही दिवसांनी डरहम कॅम्पसोबत जोडला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेळाडूच्या घशात गेल्या काही दिवसांपासून वेदना होत होत्या. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर या खेळाडूचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.


कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना तीन दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे खेळाडू संघातील इतर खेळाडूंसोबत जोडले जाणार आहेत. या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयचं लक्ष असून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. 


पाहा व्हिडीओ : Ind Vs Eng: कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या कोरोना चाचणीत एका भारतीय खेळाडूला संसर्ग



इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव 


इंग्लंडमध्ये कोणत्याही क्रिकेटरला कोरोनाची लागण होण्याची ही पहिली वेळ नाही. दोन दिवसांपूर्वी संपलेल्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानच्या सीरिजमध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी इंग्लंडच्या चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. 


खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं इंग्लंड क्रिकेट बोर्डनं पाकिस्तानसोबतची सीरिज खेळण्यासाठी आपला संपूर्ण संघच बदलला होता. इंग्लंडच्या खेळाडूंचा आयसोलेशनचा काळ संपला आहे. तसेच पाकिस्तान विरुद्धच्या टी20 सीरिजसाठी त्यांची संघात वापसी झाली आहे. 


दरम्यान, टीम इंडियामधील खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यासंदर्भात ईसीबी किंवा बीसीसीआयकडून आतापर्यंत कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही. दोन्ही देशांमध्ये पहिला कसोटी सामना चार ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :