Neeraj Chopra : नीरज चोप्राने गुरुवारी (22 ऑगस्ट) लॉसने डायमंड लीगमध्ये 89.49 मीटर दूर भाला फेकून दुसरे स्थान मिळवले. पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या नीरज चोप्राने जवळपास 90 मीटर दूर भाला फेकला आहे.  मात्र पुन्हा एकदा तो 90 मीटरचा अडथळा पार करू शकला नाही, त्यामुळे तो निराशही पाहायला मिळाला. शेवटच्या प्रयत्नात ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 90.61 मीटरचा थ्रो केला आणि अव्वल स्थानावर राहिला. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम या स्पर्धेत खेळला नाही. विशेष म्हणजे नीरज सध्या हार्निया या आजाराशी झुंजतोय. आजारीशी झुंज देत असतानाही त्याने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. 






डायमंड लीग अंतर्गत लेग मॅच गुरुवारी (22 ऑगस्ट) लुसाने येथे झाली. यानंतर दुसऱ्या टप्प्याचा सामना 5सप्टेंबर रोजी झुरिच येथे होणार आहे. डायमंड लीग फायनलसाठी नीरजला या दोनपैकी किमान एक सामना खेळणे आवश्यक होते. लेग सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वल 6 मध्ये असलेल्या भालाफेकपटूंनाच डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळेल.






पॅरिस ऑलिम्पिक 2024 नंतर, भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने लॉसने डायमंड लीग 2024 मध्ये हंगामातील सर्वोत्तम थ्रो केले आणि दुसरे स्थान पटकावले. नीरजने या महिन्यात 8 ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 89.45 मीटर अंतरावर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर हा नीरजचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो ठरला. पण आता त्याने लॉसने डायमंड लीगमध्ये 89.49 मीटर भालाफेकीच्या हंगामातील नवीन सर्वोत्तम थ्रो गाठले. नीरज चोप्राचा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो 89.94 मीटर आहे.


पुन्हा नीरज 90 मीटरचा अडथळा पार करू शकला नाही 


नीरजसाठी 90 मीटरचा अडथळा पार करणे हे  नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे. त्याने लॉसने डायमंड लीगमधील सहाव्या किंवा शेवटच्या प्रयत्नात सर्वोत्तम थ्रो पूर्ण केले. त्याने 89.49 मीटर अंतरावर भाला फेकला होता. त्याचा वैयक्तिक सर्वोत्कृष्ट विक्रम मोडणे आणि 90 मीटर अंतरावर भाला फेकण्यात त्याला अपयश आले. शेवटच्या थ्रोनंतर 90 लांब भाला फेकण्याची संधी हुकल्यानंतर तो निराश झाल्याचेही पाहायला मिळाले. 


नीरज चोप्राचे थ्रो  


पहिला प्रयत्न: 82.10 मीटर
दुसरा प्रयत्न: 83.21 मीटर
तिसरा प्रयत्न: 83.13 मीटर 
चौथा प्रयत्न: 82.34 मीटर
पाचवा प्रयत्न: 85.58 मीटर
सहावा प्रयत्न: 89.49 मीटर 


टॉप 6 मध्ये स्थान मिळवणे महत्वाचे 


पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान नीरज चोप्राने सांगितले होते की, त्याला ब्रुसेल्स, बेल्जियम येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या फायनलमध्ये खेळायचे आहे. त्यासाठी त्याला डायमंड लीगच्या चार लेगच्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल. गुणतालिकेत अव्वल-6 बनवावे लागेल. सध्या डायमंड लीगचे 3 लेग सामने झाले आहेत. आतापर्यंत नीरज चोप्राने 2 लेग मॅचमध्ये 14 पॉइंट्स मिळवले आहेत. साने डायमंड लीगनंतर आता अंतिम फेरीचा अंतिम सामना 5 सप्टेंबर रोजी झुरिच येथे होणार आहे. 


लेग सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वल 6 मध्ये असलेल्या भालाफेकपटूंनाच डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळेल. आतापर्यंत 3 लेग सामने झाले आहेत.  यातील नीरजने डायमंड लीगचे सामने दोहा आणि लुसाने येथे खेळले आहेत. दोन्ही लीगमध्ये नीरज दुसऱ्या स्थानावर राहिला आणि त्याने 7-7 गुण मिळवले.