Indian Squad For Asia Cup 2023 : अवघ्या काही दिवसांपात आशिया चषकाच्या रनसंग्रमाला सुरुवात होईल. आशिया चषक म्हणजे भारतीय संघासाठी विश्वचषकाची रंगीत तालीम आहे. आशिया चषकात खेळणारे खेळाडूच विश्वचषकात खेळताना दिसतील. त्यामुळे आशिया चषकाकडे सर्व क्रीडा चाहत्यांचे लक्ष्य लागलेय. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाची सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे. साखळी फेरीत भारताची लढत नेपाळ आणि पाकिस्तान या संघासोबत असेल. आशिया चषकाचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका होणार आहे. यातूनच भारतीय संघाला आपले कॉम्बिनेशन बसवायचेय. 


आशिया चषकात या खेळाडूंसोबत उतरणार भारतीय संघ - 


आशिया चषकात भारतीय संघ संपूर्ण ताकदीने उतरण्याची शक्यता आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आशिया चषकात विराट कोहली आणि रोहित शर्माही खेळणार आहेत. त्याशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विकेटकिपर फलंदाज केएल राहुल यांचे कमबॅक होणार आहे.  शुभमन गिल आणि रोहित शर्मा आशिया चषकात डावाची सुरुवात करतील. मीडिल ऑर्डरमध्ये  विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या यासारखे खेळाडू असतील... 


आशिया चषकात भारतीय संघात हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यासारखे अष्टपैलू खेळाडू असतील. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघ कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोन्ही फिरकीपटूंना आशिया चषकात संधी देऊ शकतो. त्याशिवाय लॉर्ड शार्दूल ठाकूर आणि जयदेव उनादकट यांनाही संधी मिळू शकते. या दोघांपैकी एका गोलंदाजाची विश्वचषकात वर्णी लागेल. शार्दूल ठाकूरचे पारडे जड दिसतेय. तीन वर्षांत शार्दूल ठाकूर याने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावीत केलेय. 


आशिया चषकासाठी भारताचे संभाव्य स्क्वॉड-


रोहित शर्मा, शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, अक्षर पटेल, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, मुकेश कुमार आणि युजवेंद्न चहल 


कधी कुठे पाहाल आशिया चषकाचे सामने?


आशिया चषकाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार, दुपारी तीन वाजता सुरु होणार आहेत. भारतीय चाहते आशिया चषकाचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येतील. त्याशिवाय  हॉटस्टार अॅपवरुनही सामन्यांचा आनंद घेता येईल. डीडी स्पोर्ट्स चॅनलवरही लाईव्ह सामना पाहाता येणार आहे. आशिया चषकाच्या ब्रॉडकास्टिंगचे राइट्स स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत.  त्याशिवाय एबीपी माझ्याच्या संकेतस्थळावरही आशिया चषकासंदर्भातील अपडेट तुम्हाला पाहाता येतील. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा स्विकार केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही? हे स्पष्ट झालेय. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. बुधवारी आशिया चषक वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होणार आहे.