ODI World Cup 2023 : अजित आगकरच्या नेतृत्वातील निवड समितीला विश्वचषक आणि आशिया चषकासाठी संघ निवड करताना तारेवरील कसरत करावी लागणार आहे. अतिरिक्त वेगवान गोलंदाजासाठी शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनादकट या दौघांपैकी एका गोलंदाजाची निवड करावी लागणार आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, 5 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक संघाला आपल्या संभाव्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. 27 सप्टेंबरपर्यंत प्रत्येकाला अतिंम 15 खेळाडूंची यादी द्यायची आहे. 


अशा स्थितीत आशिया चषक आणि मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत भारतीय संघ 16 ते 18 खेळाडूंची निवड होईल. यामधीलच अंतिम 15 खेळाडू विश्वचषकात उतरतील. तर उर्वरित तीन खेळाडू बॅकअप म्हणून असतील. शार्दूल ठाकूर आणि जयदेव उनादकट यांना आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरोधात संधी मिळणे निश्चित आहे. त्यांच्या कामगिरीनंतर दोघांपैकी एका गोलंदाजाची विश्वचषकासाठी निवड होईल. भारतीय संघाचा विश्वचषकाचे अभियान 8 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. चेन्नईमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. दोन महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला असतानाही भारतीय संघाचे कॉम्बिनेशन झाल्याचे दिसत नाही.  


केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या पुनरागमनानंतर भारतीय संघाला विश्वचषक विजायाचा प्रबळ दावेदार मानले जाईल. पण गोलंदाजीचे कॉम्बिनेशन कसे असेल.. हेही महत्वाचे आहे. भारतीय संघ चौथा वेगवान गोलंदाज आणि तिसरा फिरकीपटू कोण ? याबाबत संभ्रमात आहे.  जसप्रीत बुमराह दुखापतीमधून सावरला आहे. आयर्लंड दौऱ्यातून कमबॅक करणार आहे. त्यामुळे तो विश्वचषक आणि आशिया चषक खेळणार हे निश्चित आहे. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचेही खेळणं फिक्स आहे. हार्दिक पांड्या चौथ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावले. तो प्रत्येक सामन्यात सहा ते आठ षटके गोलंदाजी करेल, अशी आपेक्षा आहे. अतिरिक्त वेगवान गोलंदाजासाठी जयदेव आणि शार्दूल यांच्यामध्ये स्पर्धा असेल. 


जयदेव उनादकट आणि शार्दुल ठाकूर या दौघांपैकी एकाच गोलंदाजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांतील कामगिरीचा विचार केला तर शार्दुल ठाकूर पुढे असल्याचे दिसतेय. शार्दुल ठाकूर याने विडिंजविरोधात सर्वाधिक आठ विकेट घेतल्या होत्या. जयदेव याच्या कामगिरीवर मात्र प्रश्न आहे. फक्त लेफ्टी गोलंदाजी करु शकतो, हा त्याची जमेची बाजू आहे. अर्शदीप सिंह याची आशियाई खेळात निवड झाली, त्यामुळे तो विश्वचषकात खेळणार नाही, हे पक्के झालेय. 


तिसऱ्या फिरकी गोलंदाजासाठी अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांच्यामध्ये स्पर्धा असेल. रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांचे 15 मधील स्थान निश्चित आहे. आता उर्वरित जागेवर कुणाला संधी मिळते. हे लवकरच समजेल. आशिया चषकासाठी रविवारपर्यंत भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर विश्वचषकाचे चित्र जवळपास स्पष्ट होईल. 


आशिया चषकासाठी भारताचा संभाव्य संघ कसा असेल - 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रित बुमराह, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, मुकेश कुमार, युजवेंद्र चहल