Lata Mangeshkar Passes Away: भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालंय. 92 वर्षीय लता मंगेशकर यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनानं संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. लता मंगेशकर या क्रिकेटच्या मोठ्या चाहत्या होत्या. भारत आणि वेस्ट इंडीज (IND Vs West Indies) यांच्यात आज अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. भारतीय संघाकडून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आलीय. भारतीय खेळाडूंनी त्यांच्या दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी लता मंगेशकर यांचं निधन झालंय. त्यानंतर बीसीसीयनं ट्विट केलं होतं. "भारतीय खेळाडू जेव्हा वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेत मैदानावर उतरतील तेव्हा त्याच्या दंडावर काळीपट्टी बांधतील. त्याच बरोबर मैदानावर देशाचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर असेल", असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी सांगितलंय. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारनं दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय. त्यांच्या निधनानंतर अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बीसीसीआयचं ट्वीट-
लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर 28 जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र, 5 फेब्रुवारीला पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. ज्यामुळं त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. मात्र, आज उपचारदरम्यान सकाळी 8.12 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला.
हे देखील वाचा-
- Suresh Raina Father Death : भारताचा माजी किक्रेटपटू सुरेश रैना याच्या वडिलांचे निधन
- India vs West indies ODI : आजपासून भारत-वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेला सुरूवात, के. एल. राहुलची पहिल्या वनडेतून माघार
- Lata Mangeshkar : जेव्हा 1983 च्या विश्वविजेत्या टीम इंडियाच्या सत्कारासाठी लतादीदी मदत करतात...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha