India vs West indies ODI series Ahmedabad : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला आज दुपारी दीड वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरूवात होणार आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.
आज होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात ईशान किशनचा समावेश करण्यात आला आहे. शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड या सलामीच्या फलंदाजांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे हे दोघे आजचा सामना खेळू शकणार नाहीत. तर उपकर्णधार लोकेश राहुलनंही वैयक्तिक कारणास्तव पहिल्या वनडेतून माघार घेतली आहे. आज रोहित शर्मासोबत इशान किशन ओपनिंग करणार आहे. रोहित आणि इशान ही जोडी पहिल्यांदाच टीम इंडियाकडून ओपनिंग करणार आहे.
आजच्या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहली तीन नंबरवर फलंदाजी करेल. त्यानंतर ऋषभ पंत चार नंबरवर खेळणार आहे. तर सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल.
भारतीय संघ आज आपला 1000 वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. आतापर्यंत कोणत्याही संघानं 1000 सामने खेळले नाहीत. 1000 सामने खेळणारा भारत पहिला क्रिकेट संघ ठरणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.
भारत- वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
महत्वाच्या बातम्या
- Lata Mangeshkar : जेव्हा 1983 च्या विश्वविजेत्या टीम इंडियाच्या सत्कारासाठी लतादीदी मदत करतात...
- ICC U19 World Cup 2022: यंग टीम इंडियानं रचला इतिहास! महाराष्ट्रातील 'या' खेळाडूंचं विजयात मोलाचं योगदान
- ICC U19 World Cup 2022: भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव; BCCIकडून प्रत्येक खेळाडूला 40 लाखांचं बक्षीस! गांगुली, शाह म्हणाले...
- ICC U19 World Cup 2022: इंग्लंडचा धुव्वा उडवत भारतानं पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला!