Suresh Raina Father Death : भारताचा माजी अष्टपैलू सुरेश रैनाचे वडील त्रिलोकचंद रैना यांचे रविवारी, ६ फेब्रुवारी रोजी कर्करोगाने निधन झाले. लष्करी अधिकारी असलेले आणि आयुध निर्माणात बॉम्ब बनवण्यात प्रभुत्व मिळविणारे तिर्लोकचंद यांचे गाझियाबाद येथील राहत्या घरी निधन झाले.
त्रिलोकचंद रैना यांचे वडिलोपार्जित घर जम्मू-काश्मीर येथील रैनावरी येथे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 1990 च्या सुमारास काश्मिरी पंडितांच्या हत्येचे सत्र सुरू झाल्यानंतर त्यांना आपले गाव सोडावे लागले होते. त्यानंतर संपूर्ण कुटुंब मुरादनगर शहरात स्थायिक झाले. सुरेश रैनाच्या वडिलांचा पगार त्यावेळी 10 हजार रुपये होता. सुरेश रैनाच्या क्रिकेट कोचिंगसाठी त्यांना अधिक खर्च करणे शक्य नव्हते.
त्यानंतर तिर्लोकचंद रैना यांनी सुरेश रैना याला 1998 मध्ये लखनऊ येथील गुरु गोविंद सिंग स्पोर्टस कॉलेजमध्ये दाखल केले. वडिल हयात असताना काश्मीरच्या शोकांतिकेबद्दल त्याच्या वडिलांना आठवण होईल अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख न करण्याची तो नेहमी काळजी घेतो, असे सुरेश रैनाने म्हटले होते. क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्यासाठी वडिलांचा मोठा पाठिंबा होता असे सुरेश रैनाने म्हटले होते.
ऑगस्ट 2020 मध्ये सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. सोशल मीडियावर पोस्ट करत सुरेश रैनाने क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं होतं. महेंद्र सिंग धोनीने आपली निवृत्ती जाहीर केल्यानंतरच्या अवघ्या काही मिनिटानंतर सुरेश रैनाने निवृत्ती जाहीर केली.
सुरेश रैनाने 18 कसोटी सामने, 226 एकदिवसीय सामने आणि 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. रैनाने कसोटीत एक शतक आणि सात अर्धशतकांसह 768 धावा केल्या आहेत. तर, एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 5 शतके आणि 36 अर्धशतके झळकावली आहेत. रैनाने 35 च्या सरासरीने 5615 धावा केल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- ICC U19 World Cup 2022: भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव; BCCIकडून प्रत्येक खेळाडूला 40 लाखांचं बक्षीस! गांगुली, शाह म्हणाले...
- Lata Mangeshkar : जेव्हा 1983 च्या विश्वविजेत्या टीम इंडियाच्या सत्कारासाठी लतादीदी मदत करतात...