R Ashwin in Test: श्रीलंकेविरुद्ध भारताने अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजीचं दर्शन घडवत एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला. यावेळी संघातील दिग्गज खेळाडू आणि स्टार ऑफ स्पीनर रवीचंद्रन अश्विनने अप्रतिम कामगिरी करत दोन डावांत मिळून 6 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 436 विकेट्स पूर्ण केल्या असून त्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कर्णधार रोहित शर्माने देखील अश्विनचं कौतुक करत त्याला ‘ऑल टाईम ग्रेट’ अर्थात 'सर्वकालिन महान गोलंदाज' अशी उपाधी दिली आहे.


अश्विनने श्रीलंका संघाविरुद्ध मोहाली येथे झालेल्या कसोटीत 96 धावा देत सहा विकेट्स खिशात घातल्या. या सहा विकेट्समुळे त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 436 विकेट्स पूर्ण झाल्या असून यामुळे त्याने महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांचा 434 कसोटी विकेट्सचा विक्रमही मोडला आहे. दरम्यान रोहितला अश्विनच्या या 85 टेस्ट सामन्यात मिळवलेल्या कामगिरीबद्दल विचारणा केली असता तो म्हणाल, ‘‘ही कामगिरी करणं कोणत्याही क्रिकेटपटूच्या कारकिर्दीतील एक मोठी गोष्ट आहे. मी बऱ्याच काळापासून अश्विनचा खेळ बघतोय, त्याचा खेळ दिवसेंदिवस सुधारत असून अश्विन एक विश्वासू खेळाडू आहे.'' सध्या अश्विन गोलंदाजांच्या वर्ल्ड टेस्ट रँकिंगमध्ये नवव्या स्थानावर असल्यानेच रोहितने त्याला 'सर्वकालिन महान गोलंदाज' अशी उपाधी दिली आहे.


कसोटीमध्ये 400 हून अधिक विकेट घेणारा चौथा भारतीय


कसोटी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट घेणारा अश्विन हा चौथा भारतीय गोलंदाज आहे. मोहाली येथे सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत अश्विनने न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडली (431) आणि श्रीलंकेच्या रंगना हेराथ (432) यांना मागे टाकून तो आतापर्यंतचा नववा सर्वाधिक कसोटी विकोट घेणारा गोलंदाज ठरला. सक्रिय कसोटी क्रिकेटपटूंमध्ये, अश्विन हा इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जोडी स्टुअर्ट ब्रॉड (537) आणि जेम्स अँडरसन (640) नंतर तिसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.



  1. मुथय्या मुरलीधरन - 133 कसोटीत 800 विकेट्स

  2. शेन वॉर्न - 145 कसोटीत 708 विकेट्स

  3. जेम्स अँडरसन - 169 कसोटीत 640 विकेट्स

  4. अनिल कुंबळे - 132 कसोटीत 619 विकेट्स

  5. ग्लेन मॅकग्रा - 124 कसोटीत 563 विकेट्स

  6. स्टुअर्ट ब्रॉड - 152 कसोटीत 537 विकेट्स

  7. कोर्टनी वॉल्श - 132 कसोटीत 519 विकेट्स

  8. डेल स्टेन - 93 कसोटीत 439 विकेट्स

  9. आर अश्विन - 85 कसोटीत 435* विकेट्स


महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha