Shane Warne : क्रिकेट जगतात फिरकीचा जादुगार म्हणून ख्याती असलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) याचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं वॉर्नचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून शेन वॉर्नचा मृत्यूबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं पाहायला मिळत आहे. फॉक्स स्पोर्ट्सनं दिलेल्या माहितीनुसार, जगविख्यात लेग स्पिनर शेन वॉर्न थायलँडच्या कोह सामुईमध्ये होता. असं सांगण्यात येत आहे की, त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. तो थायलँडमधील एका व्हिलामध्ये बेशुद्ध पडला होता. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तोपर्यंत फार उशीरा झाला होता. वॉर्न हे गज सोडून गेला होता. दरम्यान, वॉर्नच्या मृत्यूबाबत अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. थायलँड पोलिसांकडून (Tahiland Police) या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेन वॉर्न (Shane Warne) च्या मृत्यूबाबक मोठी माहिती समोर आली आहे. थायलँडमधील एका प्रायव्हेट व्हिलामध्ये वॉर्न त्याच्या मित्रांसोबत पार्टी करत होता. त्याच व्हिलामध्ये तो त्याच्या मित्रांना बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मॅनेजमेंटकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी थायलँड पोलिसांनी आपलं वक्तव्य जारी केलं आहे. 


वॉर्न असलेल्या खोलीत आणि त्याच्या टॉवेलवर रक्ताचे डाग : मीडिया रिपोर्ट्स 


स्कायन्यूज डॉट कॉमनं थाय मीडियाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, थाय पोलिसांना वॉर्न असलेल्या खोलीत आणि त्याच्या टॉवेलवर रक्ताचे डाग आढळून आले होते. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "खोलीत रक्त पडल्याचं आढळून आलं होतं. ज्यावेळी सीपीआर सुरु करण्यात आलं होतं. त्यावेळी वॉर्नच्या तोंडातून एक द्रव्य पदार्थ बाहेर आला होता. तसेच रक्तही आलं होतं." 


शेन वॉर्नचा मित्र म्हणतो... 


शेन वॉर्नच्या मित्रानंही मृत्यूच्या एका तासापूर्वी वॉर्न काय खाल्लं होतं, यासंदर्भात माहिती दिली आहे. मित्रानं दिलेल्या माहितीनुसार, शेन वॉर्ननं त्याच्या मृत्यूपूर्वी तासाभरात टोस्टवर  वेजेमाइटचा पारंपारिक ऑस्ट्रेलियन स्नॅक्स लावून खाल्लं होतं. तसेच वॉर्ननं कपडेही घातले होते.