Virat Kohli On Aaron Finch Retirement: ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आरोनं फिंचनं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात रविवारी होणाऱ्या (11 सप्टेंबर) तिसऱ्या एकदिवसीय सामना आरोन फिंचच्या एकदिवसीय कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल. मागील काही काळापासून सातत्यानं खराब कामगिरी होत असल्यानं त्याने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या आरोन फिंचला पुढील वाटचालीसाठी जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनंही आरोन फिंचच्या निवत्तीच्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिलीय.


विराट कोहलीची प्रतिक्रिया
आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात आरोन फिंचनं अनेक सामने खेळले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दोघ अनेकदा आमने-सामने आले आहेत. "वेल डन फिंच! एवढी वर्षे तुझ्याविरुद्ध आणि तुझ्यासोबत आरसीबीमध्ये खेळणं खूप छान वाटलं. तुझ्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्याचा पुरेपूर आनंद घ्या."


आरोन फिंच काय म्हणाला?
निवृत्तीची घोषणा केल्यानंतर फिंचनं इंस्टाग्रामवर क्रिकेट जगताचे आभार मानले."काही अविश्वसनीय आठवणींसह हा एक अद्भुत प्रवास आहे. काही अद्भूत एकदिवसीय संघांचा भाग होण्यासाठी मी खूप भाग्यवान आहे. त्याचप्रमाणे, मी खेळलेल्या प्रत्येकासह अनेक लोकांचा मला आशीर्वाद मिळाला आहे. माझ्या इथपर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला मदत केली आणि साथ दिली. मी सर्वांचे आभार मानतो."


आरोन फिंचची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्द
आरोन फिंचनं 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आरोन फिंचनं त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 145 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. ज्यात त्यानं 39.14 च्या सरासरीनं 5 हजार 401 धावा केल्या आहेत. ज्यात 17 शतकांचा सामावेश आहे.


ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार कोण?
तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलाय. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला नमवून ऑस्ट्रेलियानं 2-0 अशी आघाडी घेतलीय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना 11 सप्टेंबर रोजी केर्न्समधील काजलिस स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ नव्या कर्णधाराची घोषणा करू शकते. आरोन फिंचनंतर स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिंन्स ऑस्ट्रेलिच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधाराच्या शर्यतीत आहेत. 


हे देखील वाचा-