Krunal Pandya's Twitter Account Hacked: भारताचा ऑलराऊंडर कृणाल पांड्याचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. कृणाल पांड्याचं अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकरनं त्याच्या अकाऊंटवरून अनेक मॅसेज करण्यात आले आहेत. बिटकॉइनसाठी कृणाल त्याचं अकाऊंट विकत असल्याचं ट्विट करण्यात आलंय. गुरुवारी सकाळी अकाऊंट हॅक झाल्याची घटना घडलीय.
हॅकरनं कृणालच्या ट्विटर अकाऊंटवरून काही वापरकर्त्यांसाठी काही अश्लील टिप्पण्या देखील लिहिल्या आहेत. सकाळी 7:31 वाजता हॅकरनं कृणालच्या अकाऊंटवरून एक ट्विट रिट्विट केलं. त्यानं 2 मिनिटांनंतर एका वापरकर्त्याचं आभारही मानले. हॅकरनं त्याच्या अकाऊंटवरून आतापर्यंत जवळपास 10 ट्विट केले असल्याची माहिती समोर येतेय. क्रिकेटपटूचे खाते हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनचं ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं होतं. त्यानंतर 2021 मध्ये भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याचं हॅक करण्यात आलं होतं.
कृणाल पांड्या ट्रोल
दरम्यान, बीसीसीआयनं नुकतीच वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केलीय. या मालिकेसाठी दिपक हुडाची निवड करण्यात आलीय. यामुळं कृणाल पांड्या वेडा झालाय, अशा मीम्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. कृणाल पांड्या आणि दीपक हुडा यांच्यातील वाद जगजाहीर आहे. यातच त्याची भारतीय संघात निवड झाल्यानं कृणाल असं करतोय, असंही नेटिझन्सकडून म्हटलं जातंय.
दीपक हुडा आणि कृणाल पांड्या यांच्यातील वाद
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान दीपक हुडानं कर्णधार कृणाल पांड्यानं त्याला सहकाऱ्यांसमोर शिवीगाव केल्याचा आरोप केला होता. त्यामुळं बडोदाचा संघ चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी दीपक हुडानं कृणाल पांड्याविरोधात बडोदा क्रिकेट असोशिएशनकडं लेखी तक्रार केली होती.
हे देखील वाचा-
- Dwayne Bravo Dance On Srivalli Song: ब्राव्होचं अनोखं सेलिब्रेशन! विकेट घेतल्यानंतर मैदानातच केली 'श्रीवल्ली' गाण्यावरील सिग्नेचर स्टेप्स
- IPL Auction : आयपीएलच्या लिलावात यंदा श्रीसंतवर लागणार बोली, ऑक्शनसाठी केलं रजिस्ट्रेशन
- IND vs WI: जाडेजाला संघात स्थान का नाही? बीसीसीआयनं सांगितलं कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha