(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ENG W vs IND W: इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज
ENG W vs IND W: बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धत रौप्यपदक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघ इंग्लंड (India Women tour of England) दौऱ्यावर गेलाय.
ENG W vs IND W: बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धत रौप्यपदक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघ इंग्लंड (India Women tour of England) दौऱ्यावर गेलाय. या दौऱ्यात भारत आणि इग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज रिव्हरसाईड ग्राऊंड येथे खेळला जाणार आहे. भारताविरुद्ध टी-20 मालिकेत इंग्लंडच्या संघाला संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. हीदर नाइट, नॅट सायव्हर आणि कॅथरीन ब्रंट यांसारखे खेळाडू या मालिकेचा भाग असणार नाहीत. दुसरीकडं दुखापतीमुळं बाहेर पडलेल्या जेमिमा रॉड्रिग्जला विश्रांती देण्यात आलीय.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी फक्त पाच सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. तर, 17 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. यातील 8 सामने इंग्लंडमध्ये खेळण्यात आले. ज्यात भारतानं 2 तर, इंग्लंडनं 6 जिंकले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध इंग्लंडचं पारडं जड दिसत आहे.
कुधी, कुठं रंगणार सामना?
भारत महिला विरुद्ध इंग्लंड महिला पहिला टी-20 भारतीय वेळेनुसार आज (10 सप्टेंबर) रात्री 11:30 वाजता सुरू होईल. हा सामना चेस्टर-ले-स्ट्रीटच्या रिव्हरसाईट ग्राऊंड येथे खेळला जाणार आहे. भारत महिला विरुद्ध इंग्लंड महिला पहिला T20 सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.तसेच या सामन्याचे थेट प्रवाह सोनी लीववर उपलब्ध असेल.
भारत महिला संभाव्य संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्स, स्नेह राणा, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादूर.
इंग्लंड महिला संभाव्य संघ:
लॉरेन बेल, माईया बाउचियर, अॅलिस कॅप्सी, केट क्रॉस, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, एमी जोन्स (सी), ब्रायोनी स्मिथ, इस्सी वोंग, डॅनियल व्याट.
भारतीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमाह रॉड्रिग्स, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, राधा यादव, एस मेघना, तानिया भाटिया, आर गायकवाड, डी हेमलता, सिमरन दिल बहादूर, रिचा घोष (विकेटकिपर), केपी नवगिरे.
हे देखील वाचा-