Ind women vs Eng women 2nd ODI: मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार

India women vs England women 2nd ODI Live Updates: इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा पराभव करून 1-0 अशी आघाडी घेतली.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Jun 2021 07:37 PM

पार्श्वभूमी

IND Vs ENG Women: भारतीय महिला क्रिकेट टीम आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना आज खेळला जाईल. या सामन्यात मालिका वाचवण्याचे आव्हान भारतासमोर आहे. पहिल्या सामन्यात भारताला आठ विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.


भारताची स्मृती मंधाना आणि युवा खेळाडू शैफाली वर्मा संघाला चांगली सुरुवात करण्यास अपयशी ठरले. कर्णधार मिताली राजने 72 धावा केल्या होत्या, ज्याच्या मदतीने संघ 200 ची धावसंख्या ओलांडण्यात यशस्वी झाला. इंग्लंडने हे लक्ष्य साध्य करण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागले नाही. त्यांनी हा सामना आठ विकेट्सने जिंकला.


भारतीय संघाला आपल्या गोलंदाजीच्या रणनीतीवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. नवीन गोलंदाज संघाला सुरुवातीला यश देण्यात अपयशी ठरले, तर फिरकी जोडी महागात पडली. फलंदाजीमध्येही भारताला मितालीकडून वेगवान धावा करण्याची अपेक्षा आहे. याशिवाय अनुभवी खेळाडू हरमनप्रीत कौरने पुन्हा फॉर्म मिळवणं आवश्यक आहे.


इंग्लंड चांगल्या फॉर्मात
दुसरीकडे इंग्लंडचा संघ अत्यंत संतुलित दिसत आहे. त्यांच्याकडे कॅथरीन ब्रंट आणि अन्या श्रुबसोलेसारखे वेगवान गोलंदाज आहेत तर डावखुरी फिरकीपटू सोफी इक्लेस्टोन देखील खूप प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. भारतीय गोलंदाजांनाही इंग्लंडच्या फलंदाजीबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. टॅमी ब्यूमॉन्ट (नाबाद 87) आणि नताली सायव्हर (नाबाद 74) यांनी अर्धशतक झळकावले आहे. 


दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
इंग्लंडः हीथ नाइट (कर्णधार), फरान विल्सन, सोफिया डंकली, कॅथरीन ब्रंट, नताली सायव्हर, मॅडी विलीयर्स, टॅमी ब्यूमॉन्ट, अ‍ॅमी अॅलन जोन्स, लॉरेन विनफिल्ड, एमिली एरलोट, कॅट क्रॉस, फ्रेया डेव्हिस, सफिया इक्लेस्टोन, नताशा फॅरंट, सारा ग्लेन आण्या श्रुबसोले.


भारतः मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया, इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुणधती रेड्डी , पूनम यादव, एकता बिष्ट आणि राधा यादव.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.