IND-W vs AUS-W Pink ball Test : तब्बल 15 वर्षांनंतर भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान कसोटी सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सकाळी 10 वाजता क्विन्सलॅन्ड मैदानावर हा सामना सुरु होणार आहे. महत्वाचं म्हणजे हा सामना पिंक बॉलवर होणार असून भारतीय महिला संघ पहिल्यांदाच पिंक बॉलवर खेळणार आहे.
भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. तिसरा एकदिवसीय सामना जिंकून भारताने ऑस्ट्रेलिया विरोधातल्या सलग 26 सामन्यांच्या पराभवाची मालिका खंडित केली. आताही भारतीय संघ त्यांचा हा पहिलाच पिंक बॉल कसोटी सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.
भारत आणि ऑस्ट्रिलिया महिला संघादरम्यान 2006 साली शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात आला होता. आता तब्बल 15 वर्षांनंतर हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येणार आहेत. आता हे दोन्ही संघ आपल्या या ऐतिहासिक कसोटी सामन्यामध्ये कशा प्रकारची खेळी करतात ते पाहणं औत्सुक्याचं आहे. भारताच्या झुलन गोस्वामी आणि ऑस्ट्रेलियाच्या ईलाइस पेरी यांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. भारतीय संघाला हरमनप्रितशिवाय खेळावं लागणार आहे.
India (संभाव्य): शेफाली वर्मा, स्मृती मानधना, मिथाली राज (कर्णधार), पुनम राऊत किंवा यस्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, स्नेहा राणा, तानिया भाटिया (wk), पूजा वेस्त्राकर किंवा शिखा पांडे, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड
Australia संभाव्य): अलिसा हेली (wk), बेथ मुनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ईलाइस पेरी, ताहलिया मॅग्राथ, अॅश गार्डनर, अॅनाबेल सुथरलॅन्ड, जॉर्जिया वेअरहॅम, डार्सी ब्राऊन, स्टीला कॅप्बेल
संबंधित बातम्या :