खणखणीत षटकार लगावत अर्धशतक, धोनीचा विक्रमही मोडला, पाहा रोहितचे रेकॉर्ड
India vs West Indies 2nd Test Rohit Sharma : भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक गमावली खरी पण फलंदाजीत त्याने दमदार कामगिरी केली.
India vs West Indies 2nd Test : भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक गमावली खरी पण फलंदाजीत त्याने दमदार कामगिरी केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. रोहित शर्माने खणखणीत षटकार मारत अर्थशतक झळकावले. रोहित शर्माने भारताच्या डावाचा पाया रचला. रोहित शर्मा याने आपल्या या खेळीत आतापर्यंत अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. पाहूयात रोहित शर्माने कोण कोणते विक्रम केले...
कर्णधार असताना रोहित शर्माने 150 षटकारांचा पल्ला पार केला.
रोहित शर्माने माजी कर्णधार एम एस धोनीचा विक्रम मोडला. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा भारतीय खेळाडू झालाय.
जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माच्या दोन हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. असा पराक्रम करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू आहे. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराट कोहलीने 33 कसोटी सामन्यातील 55 डावात 1942 धावा चोपल्या आहेत.
रोहित शर्माने कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात वेगवान दोन हजार धावांचा पल्ला पार केला आहे. याआधी हा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावावर होता.
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे. लागोपाठ दोन सामन्यात शतकी भागिदारी करणारी सहावी सलामी जोडी ठरली आहे. याआधी भारताकडून विरेंद्र सेहवाग-मुरली विजय, सुनील गावसकर- फारुख इंजिनिअर, अंशुमन गायकवाड-सुनील गावसकर, अरुण लाल-सुनील गावसकर आणि सदगो्पन रमेश आणि देवांश गांधी यांचा क्रमांक लागतो. त्याशिवाय विदेशात लागोपाठ दोन शतकी भागिदारी करण्याचा विक्रमही रोहित आणि यशस्वीच्या नावावर झालाय.
रोहित-यशस्वीची दमदार सुरुवात -
यजमान वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचा हा निर्णय चुकीचा ठरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी वनडे स्टाईल सुरुवात केली.पहिल्या कसोटी सामन्यात द्वितकी भागिदारी करणारे रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्या कसोटी सामन्यातही या जोडीने दमदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी १३९ धावांची भागिदारी केली.
रोहित शर्माने ८० धावांची दमदार खेळी केली. या खेळीत रोहित शर्माने दोन षटकार आणि ९ चौकार लगावले. रोहित शर्मा याचं शतक अवघ्या २० धावांनी हुकले. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावले होते, दुसऱ्या कसोटी सामन्यात ८० धावांची खेळी केली.
Rohit Sharma today:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 20, 2023
- 2,000 in WTC history.
- 2,000 Test runs as an opener.
- Became 5th highest run scorer for India.
- The Hitman, captain! pic.twitter.com/mFCvLGRRhV
Rohit Sharma is now the 3rd highest run getter among active players.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 20, 2023
- The Hitman is breaking records today! pic.twitter.com/kR8d4EcUz0