Indian Players Covid Positive: भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध (India vs West Indies) सामने खेळण्यासाठी सज्ज झाला असतानाच संघात (Team India) कोरोना महामारीने (Corona) शिरकाव केला आहे. भारतीय संघातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. या खेळाडूंमध्ये स्टार फलंदाज शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय संघ सध्या अहमदाबाद येथे सराव करत आहे. दरम्यान सध्या बीसीसीआयची मेडिकल टीम खेळाडूंची काळजी घेत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान 6 फेब्रुवारीपासून सुरु होणारी एकदिवसीय सामन्यांची मालिकाही पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान
वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा टी20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक
एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
हे ही वाचा -
- IPL 2022 Player Auction List Announced: आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये 590 खेळाडूंवर लागणार बोली; कोणत्या संघाकडं किती पैसे शिल्लक? पाहा संपूर्ण यादी
- PKL 2021 Live Streaming: बंगाल वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्सचा सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा?
- Road Safety World Series: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच मैदानात, 'या' चार शहरांमध्ये खेळवले जातील सामने
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha