India vs Sri Lanka T20 Series Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket Team) श्रीलंकेला रवाना झाला आहे. नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या नेतृत्वाखाली कर्णधार सूर्यकुमार यादवसह (Suryakumar Yadav) टी-20 मालिकेतील खेळाडू श्रीलंकेला रवाना झाले आहेत. भारतीय संघाला श्रीलंकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका टीव्ही आणि मोबाईलवर थेट कशी पाहता येईल हे जाणून घ्या...
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी पल्लेकेले येथे होणार आहे. यानंतर दुसरा टी-20 सामना 28 जुलैला आणि तिसरा टी-20 सामना 30 जुलैला खेळवला जाईल. हे दोन्ही सामने पल्लेकेले येथे होणार आहेत. ही मालिका गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली असणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका कधी, कुठे आणि कशी बघता येणार?
सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर टीव्हीवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका तुम्ही पाहू शकाल. तर मोबाईलवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना सोनी लाइव्ह ॲपवर ही मालिका पाहता येणार आहे. ही मालिका हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रसारित होणार आहे. मोबाईलवर सामना पाहण्यासाठी तुम्हाला सोनी लाईव्हचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ-
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या , शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज , वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.
भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक-
27 जुलै - 1ली टी-20 (पल्लेकेले)
28 जुलै - दुसरी टी-20 (पल्लेकेले)
30 जुलै - तिसरी टी-20 (पल्लेकेले)
2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)
4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)
7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)
संबंधित बातम्या:
रंगेहाथ पकडलं अन्...; हार्दिक पांड्याच्या चुकीची शिक्षा नताशा भोगतेय?, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?