Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि पत्नी नताशा स्टॅनकोविकने (Natasha Stankovic) यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 18 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. 


नताशा मुलगा अगत्स्यसह मायदेशी रवाना झाली. तर हार्दिक पांड्या श्रीलंका दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झाला आहे. हार्दिक आणि नताशा यांच्यात नेमकं काय घडलं की घटस्फोटचा निर्णय घेतला, याबाबत सध्या सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहे.  याचदरम्यान रेडिटवरील एका पोस्टद्वारे हार्दिक आणि नताशाचं घटस्फोटाचं कारण जाणून न घेता नेटकऱ्यांनी नताशाला दोष देण्यास सुरुवात केली आहे. मात्र यामध्ये हार्दिक पांड्याची चुकी आहे, असा दावाही करण्यात आला आहे. 


रेडिटवरील पोस्टमध्ये नेमकं काय?


हार्दिक पांड्याचे विवाहबाह्य संबंध होते आणि हेच घटस्फोटामागील महत्वाचं कारण ठरलंय. सदर पोस्ट करणाऱ्याने म्हटलंय की, नताशासोबत लग्न झाल्यानंतर हार्दिक पांड्याने सर्व जुन्या सवयी सोडल्या होत्या. मात्र 2023 पासून हार्दिकने इतर मुलींसाठी नताशाची फसवणूक सुरु केली. यावेळी नताशाने हार्दिक पांड्याला रंगेहाथ पकडलं आणि खऱ्या अडचणी सुरु झाल्या.  यानंतर दोघांनीही एकमेकांची बदनामी न करता शांततेत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ही माहिती मला त्यांच्यासोबत राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या व्यक्तीने दिली, असा दावाही या पोस्टद्वारे करण्यात आला आहे.


चार वर्षांचा संसार मोडला-


हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले होते. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगमध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या विधींची पुनरावृत्ती केली. यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पडले होते. एका दिवसानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.


हार्दिक आणि नताशाने पोस्टद्वारे काय म्हणाले?


'चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेरीस मी आणि नताशाने या नात्याला विराम देण्याचे ठरवले आहे. एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेण्याआधी आम्ही हे नाते वाचविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण आता वाटतेय की हा निर्णय आमच्या दोघांच्या हिताचा आहे. आमच्या कुटुंबात आम्ही एकत्र अनुभवलेला आनंद व एकमेकांबद्दलचा आदर कायम स्मरणात असेल त्यामुळेच हा निर्णय घेणे कठीण होते. आम्हाला अगस्त्यच्या रूपात आशीर्वादच मिळाला आहे, त्यामुळे त्याचे हित हे आम्हा दोघांच्या आयुष्यात केंद्रस्थानी असेल. त्याच्या आनंदासाठी आम्ही पालक म्हणून जे काही करू शकतो ते सर्व करू, या कठीण व संवेदनशील वेळी आमच्या खासगी आयुष्याचा आदर राखावा ही विनंती. आपल्याकडून यावेळी पाठिंबा, समजूतदारी व प्रेमाची आम्ही अपेक्षा करतो.


संबंधित बातमी:


हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाची पहिली पोस्ट; भारताबाहेर गेल्यावर काय करतेय?