IND vs SL, 2nd T20I Live updates : भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
IND vs SL, 2nd T20 Live Streaming : वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिल्यानंतर श्रीलंकेचा व्हाईट वॉश करण्यास टीम इंडिया सज्ज झाली आहे. पाहा दुसऱ्या टी20 सामन्यातील प्रत्येक अपडेट्स फक्त एका क्लिकवर
IND vs SL, 2nd T20I : श्रेयस अय्यरच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने श्रीलंका संघाचा सात गड्यांनी पराभव केला.
IND vs SL, 2nd T20I : भारतीय संघ विजयाजवळ पोहचला आहे. भारताला विजयासाठी फक्त 8 धावांची गरज
IND vs SL, 2nd T20I : भारतीय संघाला तिसरा धक्का बसला आहे. संजू सॅमसन 39 धावांवर बाद
श्रेयसचे तुफानी अर्धशतक, भारत विजयाजवळ
IND vs SL, 2nd T20I : भारतीय संघाला दुसरा धक्का बसला आहे. रोहित शर्मा पाठोपाठ ईशान किशनही बाद झाला आहे. ईशान किशनने 16 धावांची खेळी केली. भारतीय संघाच्या दोन बाद 44 धावा
IND vs SL, 2nd T20I : तीन षटकानंतर भारताच्या एक बाद 23 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा एक धावेंवर बाद झाला. ईशान किशन 14 तर श्रेयस अय्यर पाच धावांवर खेळत आहे.
IND vs SL, 2nd T20I : भारतीय संघाला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा अवघ्या एका धावेंवर बाद
IND vs SL, 2nd T20I : पथुम निसांका याच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंका संघाने निर्धारित 20 षटकांत पाच बाद 183 धावा काढल्या आहेत. भारतीय संघाला दुसरा सामना जिंकण्यासाठी 184 धावांचे आव्हान मिळाले आहे. दनुष्का गुणथिलका आणि पथुम निसांका यांनी श्रीलंका संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. पहिल्या काही षटकांमध्ये लंकेच्या सलामीवीरांना साधव फलंदाजी केली. त्यानंतर दोघांनाही तुफान फटकेबाजी केली. निसांका याने 53 चेंडूत 75 धावांची खेळी केली. तर गुणथिलका याने 38 धावांची खेळी केली आहे.
भुवनेश्वर कुमारने विस्फोटक फलंदाज निसांकाला बाद करत भारताला पाचवे यश मिळवून दिले आहे. निसांकाने 75 धावांची तुफानी खेळी केली
श्रीलंकेचा विस्फोटक फलंदाज निसांका याने फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला आहे. निसांकाने तुफानी अर्धशतकी खेळी केली आहे.
IND vs SL : श्रीलंकेला चौथा धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराहने चंडीमलला बाद केल.
IND vs SL : रविंद्र जाडेजाने भारताला पहिले यश मिळवून दिले आहे. आक्रमक गुणाथिलका याला जाडेजाने वेंकटेशकरवी झेलबाद केले. 9 षटकानतर 1 बाद 71 धावा
IND vs SL, 2nd T20 : दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी योग्य टप्यावर मारा केला आहे. श्रीलंका संघाने संथ सुरुवात केली आहे. पाच षटकानंतर श्रीलंका संघाने बिनबाद 25 धावा केल्या आहेत.
IND vs SL : श्रीलंका संघात दोन बदलल कऱण्यात आले आहेत.
IND vs SL, 2nd T20 : रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे.
मायदेशात आतापर्यंत सर्वाधिक टी-20 सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्याबाबतीत रोहित शर्मा हा मॉर्गन आणि विल्यमसन यांच्या बरोबरीने उभा आहे. रोहित शर्मानं आतापर्यंत 16 टी-20 सामन्यात भारताचं नेतृत्व केलंय. यापैकी 15 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, केवळ एका सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागलाय. इयॉन मॉर्गन आणि केन विल्यमसनंही संघाचं नेतृत्व करत त्यांच्या मायदेशात आतापर्यंत 15 टी-20 सामने जिंकले आहेत. दरम्यान, श्रीलंकाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात आज भारतानं विजय मिळवला तर रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ 16 वा टी-20 सामना जिंकून इतिहासाची नोंद करेल.
India vs Sri Lanka 2nd T20 live updates : भारतीय संघ धर्मशाळा मैदानावर दाखल झाला आहे. सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ मैदानावर दाखल झाला आहे.
India vs Sri Lanka 2nd T20 live updates : टीम इंडिया एकापाठोपाठ एक विजय संपादन करत आहे. वेस्ट इंडिजला 3-0 च्या फरकाने धूळ चारल्यानंतर श्रीलंकाविरोधातील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. एकीकडे संघ दमदार कामगिरी करत असताना खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. आता सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाला आहे. ऋतुराज गायकवाडच्या जागी सलामी फलंदाज मयांक अग्रवाल याला संधी देण्यात आला आहे. मयांकला बॅकअप सलाम फलंदाज म्हणून बोलवण्यात आले आहे. 26 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यासाठी मयांक टीम इंडियात दाखल झाला आहे. बीसीसीआयने ट्विट करत याची माहिती दिली आहे.
India vs Sri Lanka 2nd T20 live updates : भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत भारतानं सर्वाधिक विजय मिळवले आहेत. तर, श्रीलंकेच्या संघानं भारताविरुद्ध निराशाजनक कामगिरी केलीय. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 23 टी-20 सामने खेळण्यात आले. यापैकी 15 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, सात सामन्यात पराभावाची धुळ चाखली आहे.
पार्श्वभूमी
IND vs SL, 2nd T20 Live Streaming : वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिल्यानंतर श्रीलंकेचा व्हाईट वॉश करण्यास टीम इंडिया सज्ज झाली आहे. धर्मशाला मैदानावर भारताचा दुसरा टी20 सामना होणार आहे. पहिला सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली आहे. तीन सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 च्या फरकाने आघाडी घेतली आहे. भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर श्रीलंका संघ मालिकेत बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरले.
लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतानं 62 धावांनी श्रीलंकेला पराभूत केलं. या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे.
कोणाचं पारड जड?
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत भारतानं सर्वाधिक विजय मिळवले आहेत. तर, श्रीलंकेच्या संघानं भारताविरुद्ध निराशाजनक कामगिरी केलीय. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 23 टी-20 सामने खेळण्यात आले. यापैकी 15 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, सात सामन्यात पराभावाची धुळ चाखली आहे.
दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संघाबाहेर -
टीम इंडिया एकापाठोपाठ एक विजय संपादन करत आहे. वेस्ट इंडिजला 3-0 च्या फरकाने धूळ चारल्यानंतर श्रीलंकाविरोधातील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. एकीकडे संघ दमदार कामगिरी करत असताना खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. आता सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाडच्या जागी सलामी फलंदाज मयांक अग्रवाल याला संधी देण्यात आला आहे. मयांकला बॅकअप सलाम फलंदाज म्हणून बोलवण्यात आले आहे. 26 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यासाठी मयांक टीम इंडियात दाखल झाला आहे.
भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण -
ऋतुराज गायकवाडआधी दुखापतीमुळे उपकर्णधार के.एल राहुल आणि वॉशिंगटन सुंदर श्रीलंका मालिकेला मुकले आहेत. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि दीपक चाहरला दुखापतीमुळे मालिका अर्ध्यावर सोडावी लागली होती
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -