Ind vs SA match live streaming : भारत आणि दक्षिण आफ्रीका (Ind vs SA) यांच्यीतील कसोटी मालिकेतील (Test Series) तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना आफ्रिकेच्या केपटाउन येथे मंगळवारपासून सुरु होत आहे.  तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 च्या बरोबरीत असून यामुळे भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. कारण ही कसोटी जिंकताच भारत मालिकाही जिंकेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा मान भारताला मिळेल. पण केपटाऊनमधला हा विजय भारताला सोपा नसून आतापर्यंत या मैदानात खेळलेल्या पाच पैकी पाच सामन्यात भारताला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. 

Continues below advertisement

कू-

Continues below advertisement

 

किती वाजता सुरु होणार सामना?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना मंगळवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरु होईल. नाणेफेक दुपारी 1.30 वाजता असेल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका तिसरा कसोटी सामना कुठे खेळवला जाणार?

हा सामना केपटाउनच्या न्‍यूलँड्स स्टेडियममध्ये खेळवला जाईल.

या सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?

सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे.

सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

सामन्याच लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार वर पाहू शकता. तसंच आमच्या abplive.com ला लाईव्ह अपडेट्स साठी फॉलो करत राहा.  

हे ही वाचा - 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha