New Zealand Vs Bangladesh: न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात काईस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिला कसोटी सामना जिंकून इतिहास रचणारा बांगलादेशचा संघ न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी सज्ज झालाय. तर, न्यूझीलंडचा संघ दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका ड्रा करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, दुसऱ्या कसोटी दरम्यान बांगलादेशकडून अशी एक चूक घडली. ज्यामुळं न्यूझीलंडच्या संघाला एका चेंडूत धावा मिळाल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.


दरम्यान,बांगलादेश विरुद्ध सामन्यातील 26 व्या षटकात न्यूझीलंडचा फलंदाज विल यंग फलंदाजी करीत होता. तर, बांगलादेशचा इबाद्दत हुसैन गोलंदाजी करीत होता. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विल यंगच्या बॅटला चेंडू लागून स्लीपला गेला. त्यावेळी बांगलादेशच्या खेळाडूनं झेल पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू खेळाडूच्या हातातून निसटून बॉन्ड्रीच्या दिशनं गेला. त्यानंतर विल यंग आणि टॉम लॅथम यांनी तीन धावा काढल्या. दरम्यान, खेळाडूनं चेंडू पकडून गोलंदाजाच्या दिशेनं थ्रो केला. परंतु, हा चेंडू गोलंदाजाच्या हातातून निघून बॉन्ड्रीबाहेर गेला. या चेंडूवर फलंदाजांनी तीन धावा पळल्या आणि ओव्हरथ्रोचे चार धावा अशा एकून सात धावा न्यूझीलंडला मिळाल्या.


व्हिडिओ-



न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या बांगलादेशनं न्यूझीलंडच्या संघावर तब्बल 8 विकेट्स राखून विजय मिळवलाय. या विजयात बांगलादेशचा गोलंदाज इबादर हुसैननं सर्वश्रेष्ठ कामगिरी केलीय. त्यानं 46 धावांत 6 विकेट्स पटकावले. हुसैनच्या या कामगिरीमुळं बांगलादेशनं न्यूझीलंडचा दुसरा डाव 169 धावांवर गुंडाळला. बांगलादेशला विजयासाठी अवघ्या 40 धावांचं लक्ष्य मिळालं. जे बांगलादेशनं 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha