Suryakumar Yadav and Marco Jansen video : भारतीय संघाने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात संजू सॅमसनने भारतीय संघासाठी शतक झळकावले आणि टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. या खेळाडूंमुळेच टीम इंडिया सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. पण या सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा पाहिला मिळाला, नेमकं घडलं काय? हे जाणून घेऊया....


दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या 15व्या षटकात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. हे षटक रवी बिश्नोईने टाकले आणि त्याच्या दुसऱ्या चेंडूवर गेराल्ड गोएत्झीने एक धाव घेतली. त्यानंतर चेंडू अर्शदीप सिंगने पकडला आणि तो यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या दिशेने फेकला. हा थ्रो पकडण्यासाठी संजू खेळपट्टीच्या दिशेने पळत होता, त्यानंतर आफ्रिकन खेळाडू मार्को जॅन्सनला कदाचित हे आवडले नाही आणि तो संजूशी भिडला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने यष्टिरक्षक संजूच्या बचावात मार्को यान्सनशी बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली, मग अंपायरही त्यांच्याकडे धावत आले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






संजू सॅमसनची आश्चर्यकारक कामगिरी


नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अभिषेक शर्मा लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र यानंतर संजू सॅमसनने तुफानी खेळी करत अवघ्या 47 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने एकूण 107 धावा केल्या. त्याच्यामुळेच संघाला 202 धावा करण्यात यश आले. त्याच्याशिवाय तिलक वर्माने 33 धावांचे योगदान दिले.


गोलंदाजांनीही दाखवून दिली आपली ताकद 


फलंदाजांनंतर भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज उभे राहू शकले नाहीत आणि लवकरच तंबूत परतले. या दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. याशिवाय आवेश खानच्या खात्यात दोन विकेट गेल्या. अर्शदीप सिंगने एक विकेट घेतली.


हे ही वाचा -


Gautam Gambhir vs Rohit Sharma : टीम इंडियात फूट? 'या' दोन खेळाडूंमुळे कर्णधार रोहित शर्मा-गौतम गंभीरमध्ये भांडण, अहवालात धक्कादायक खुलासा


Team India : बंद खोलीत रोहित, गंभीरशी 6 तास खलबतं, न्यूझीलंडसोबतच्या मॅचमुळे जखम भळभळल्याने BCCIॲक्शन मोडमध्ये; चर्चा काय?