Team India Vs South Africa 2nd ODI Score: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला (Team India) 8 विकेट्सनी दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. हा सामना मंगळवारी (19 डिसेंबर) सेंट जॉर्ज पार्क, गाकबेर्हा येथे खेळवण्यात आला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं (India National Cricket Team) 8 गडी राखून विजय मिळवला होता. 


सध्या टीम इंडिया आणि आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील ही सीरिज 1-1 अशी बरोबरीत आहे. आता तिसरा आणि निर्णायक सामना 21 डिसेंबरला पार्लमध्ये खेळवला जाईल. सीरिज जिंकण्यासाठी केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला शेवटचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.


जोरजीचं झंझावाती शतक, टीम इंडियाकडून हिसकावला विजय 


दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामनं नाणेफेक जिंकून सर्वात आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय क्रिकेट संघानं त्यांना 212 धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्युत्तरात आफ्रिकन संघानं 2 गडी गमावून अवघ्या 42.3 षटकांत सामना जिंकला.


आफ्रिकन डावांत टोनी डी जोर्जीनं 122 चेंडूत 119 धावांची नाबाद शतकी खेळी केली. या खेळीत टोनीनं 6 षटकार आणि 9 चौकार लगावले. हे त्याचं वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक होतं. याशिवाय रीझा हेंड्रिक्सनं 81 चेंडूत 52 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांपैकी कोणीही आफ्रिकन फलंदाजांवर दबाव टाकू शकला नाही. केवळ अर्शदीप सिंह आणि रिंकू सिंहला प्रत्येकी 1 बळी घेता आला. 


अशी ढेपाळली टीम इंडिया : (215/2, 42.3 ओवर्स) 


पहिला विकेट : रीजा हेंड्रिक्स (52), विकेट : अर्शदीप सिंह (130/1)
दुसरा विकेट : रस्सी वॅन डर डुसेन (36), विकेट : रिंकू सिंह (206/2)


सुदर्शन आणि राहुलनं अर्धशतकी खेळी खेळली


या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर सर्वात आधी फलंदाजी करताना भारतीय क्रिकेट संघ 46.2 षटकांत 211 धावांवरच मर्यादित राहिला. साई सुदर्शननं संघासाठी 83 चेंडूत सर्वाधिक 62 धावा केल्या. तर कर्णधार केएल राहुलनं 56 धावांची खेळी केली. याशिवाय अन्य कोणताही फलंदाज छाप सोडू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरनं सर्वाधिक 3 बळी घेतले आहेत. तर ब्युरॉन हेंड्रिक्स आणि केशव महाराज यांनी 2-2 विकेट घेतल्या. केशव महाराज आणि लिझाड विल्यम्स यांना 1-1 यश मिळाले.


साई सुदर्शननं अर्धशतक ठोकून इतिहास रचला


साई सुदर्शन 83 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. यासह त्याने एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. पदार्पणानंतर सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये अर्धशतक करणारा सुदर्शन दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम नवज्योत सिंह सिद्धू (73 आणि 75) यांच्या नावावर होता. यापूर्वी सुदर्शननं नाबाद 55 धावा केल्या होत्या. टी-20 क्रिकेटमध्ये कहर केल्यानंतर रिंकू सिंहने आता या सामन्याद्वारे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. स्टार फिरकीपटू कुलदीप यादवनं त्याला पदार्पणाची कॅप दिली.


भारतीय क्रिकेट संघाचे विकेट्स : (211, 46.2 ओवर्स) 


पहला विकेट : ऋतुराज गायकवाड (4), विकेट : नांद्रे बर्गर (4/1) 
दुसरा विकेट : तिलक वर्मा (10), विकेट :  नांद्रे बर्गर (46/2) 
तिसरा विकेट : साई सुदर्शन (62), विकेट : लिजाद विलियमस (114/3) 
चौथा विकेट : संजू सैमसन (12), विकेट : ब्यूरन हेंड्रिक्स (136/4) 
पांचवा विकेट : केएल राहुल (56), विकेट : नांद्रे बर्गर (167/5) 
सहावा विकेट : रिंकू सिंह (17), विकेट : केशव महाराज (169/6) 
सातवा विकेट : कुलदीप यादव (1), विकेट : केशव महाराज (172/7) 
आठवा विकेट : अक्षर पटेल (7), विकेट : एडेन मार्करम (186/8) 
नववा विकेट : अर्शदीप सिंह (18), विकेट : ब्यूरन हेंड्रिक्स (204/9) 
दहावा विकेट : आवेश खान (9), विकेट : रनआउट (211/10)