India vs Pakistan Women's T20 World Cup : आज भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमनेसामने येणार आहेत. महिला T20 विश्वचषकात (Women's T20 World Cup 2023) आज 12 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारत-पाकिस्तानचा सामना कोणत्याही खेळातील असो, प्रत्येकाला या सामन्याची उत्सुकता असते. गेल्या वेळी आशिया कप टी-20 सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने आज भारत मैदानात उतरेल. आज महिला T20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तानचा हा पहिला सामना असेल. दरम्यान, टीम इंडियाची (Team India) उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) दुखापतीमुळे सामन्याबाहेर होऊ शकते. 


महिला T20 विश्वचषकामध्ये दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तानचे (IND vs PAK) संघ ब गटात आहेत. या गटात इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजचे संघही आहेत. पाच संघांच्या या गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. त्याचप्रमाणे अ गटातही 5 संघ असून त्यापैकी दोन संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे.




रविवारी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर 'ग्रुप ब'मधील दोन्ही संघांची लढत होणार आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सलामी सामना आहे.  भारताची धुरा हरनप्रीत कौरच्या हातात तर पाकिस्तानची धुरा बिस्मा मारूफकडे आहे. महिला T20 विश्वचषकातील शेवटच्या सातव्या स्पर्धेमध्ये भारत उपविजेता होता. अंतिम फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता.


टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11?


भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.


भारत-पाकिस्तान महिला T20 विश्वचषक सामना कधी?


महिला T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 12 फेब्रुवारीला (रविवारी) रंगणार आहे.


सामना कुठे खेळला जाईल?


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला टी-20 विश्वचषक सामना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.


सामना कधी सुरू होईल?


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होईल. संध्याकाळी 6 वाजता नाणेफेक होईल.


कुठे पाहाल सामना?


महिला T20 विश्वचषकाचे सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकता.


पाहा लाईव्ह मॅच


हॉटस्टार ॲपवर भारत-पाकिस्तान सामन्याचं लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Womens T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी! स्टार फलंदाज स्मृती मंधानाला दुखापत