India vs Pakistan ODI : भारताकडून कोणतीही इच्छा न दर्शवल्यानंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) प्रमुख रमीज राजा (Rameez Raja) यांनी चार देशांत एकदिवसीय सामन्यांची टूर्नामेंट खेळवण्याबाबतचा प्रस्ताव बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीसमोर (Sourav Ganguly) ठेवणार आहे. 19 मार्च रोजी दुबईमध्ये होणाऱ्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत रमीज याबाबत गांगुलीकडे प्रस्ताव मांडणार आहेत.


रमीजने नॅशनल स्टेडियमवर पत्रकारांशी या टूर्नामेंटबाबत बोलताना ही माहिती दिली असून यामध्ये भारत आणि पाकिस्तानसह (India vs Pakistan) ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) या संघानाही सामिल करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे. या स्पर्धेचा मूळ हेतू भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडू एकमेंकाविरुद्ध अधिक सामना खेळतील हा असणार आहे. याबाबत बोलताना रमीज म्हणाले,‘‘मी दुबईमध्ये होणाऱ्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत सौरव गांगुलीशी याबाबत बोलणार आहे. आम्ही दोघेही माजी खेळाडू आणि माजी कर्णधार आहोत. आमच्यासाठी क्रिकेटचं महत्त्व खूप असून भारत सहमत नसल्यासही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसोबत पाकिस्तान ही स्पर्धा खेळू शकते.’’


भारत पाकिस्तानात येणार - रमीज राजा


रमीजने यावेळी विश्वास दाखवला की,भारतीय संघ पुढील वर्षी आशिया कप (Asia Cup) खेळण्यासाठी पाकिस्तानात नक्कीच येईल. पण जर ते आले नाहीत तर काय करायचा याचा यावेळी विचार केला जाईल. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha