IPL 2022 : जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग असणाऱ्या इंडीयन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलला सुरु होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व संघ जवळपास तयार झाले असून अनेक खेळाडूंना मात्र या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यात अगदी सुरेश रैना सारखे खेळाडू देखील सामिल आहेत. दरम्यान टेस्ट स्पेशलिस्ट हनुमा विहारीला देखील कोणत्याच संघाने विकत घेतलं नसल्याने तो आता ढाका प्रिमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. हनुमा विहारीसह अभिमन्यु ईश्वरनसह सात भारतीय क्रिकेटपटूंना ढाका प्रीमियर लीगमध्ये एकदिवसीय क्रिकेट टूर्नामेंट खेळायला मिळणार आहे.
आयपीएलमध्ये न निवडण्यात आलेल्या भारतीय क्रिकेटपटूंसाठी याठिकाणी ‘फ्री विंडो’ आहे. आयपीएल 26 मार्चपासून सुरु होणार असून श्रीलंकेविरुद्ध हनुमाने भारतीय संघातून खेळल्यानंतर आता ढाका लीगमधील अबहानी लिमिटेडसोबत करार केला असून तो हैदराबादमध्ये विश्रांती घेऊन लवकरच संघासोबत जोडला जाणार असल्याचं समोर येत आहे. याशिवाय बंगालचा कर्णधार ईश्वरन 2017 आणि 2019 नंतर तिसऱ्या सत्रातही ढाकाच्या प्राइम बँक क्रिकेट क्लबशी जोडला जाणार आहे. त्याला ढाका लीग खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डकडून सोमवारी परवानगी मिळाली आहे.
अन्य भारतीय खेळाडूंमध्ये परवेज रसूलला शेख जमाल धनमोंदी, बाबा अपराजितला रूपगंज टायगर्स, अशोक मेनारियाला खेलाघर, चिराग जानीला लेजेंड्स ऑफ रूपगंज आणि गुरिंदर सिंहला बाजी ग्रुप ऑफ क्रिकेटर्सने त्यांच्यासोबत जोडलं आहे. या टूर्नामेंटमध्ये 11 टीम सहभाग घेणार आहे.
हे देखील वाचा-
- IND vs SL : श्रीलंकेच्या पराभवानंतरही भारतीय खेळाडूंनी लकमलला का दिल्या शुभेच्छा? नेमकं कारण काय?
- Kapil Dev : भारताचे महान ऑलराऊंडर कपिल देव यांचा आवडता ऑलराऊंडर खेळाडू माहित आहे का?
- IND vs SL Test : श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी, अर्धशतक ठोकत नवा रेकॉर्ड केला नावावर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha