IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील डे-नाइट टेस्टमध्ये भारताने दमदार कामगिरी करत 238 धावांनी सामना जिंकला. यावेळी जसप्रीत बुमराहने खास योगदान दिलं. त्याने अप्रतिम ओव्हर करत महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या. याच दरम्यान त्याने विकेट घेतल्यानंतर श्रीलंकेच्या सुरंगा लकमल याच्याशी खास हात मिळवत त्याला शुभेच्छा दिल्या. दरम्यान याचा व्हिडीओही बीसीसीआयने पोस्ट केला आहे. लकमल याचा हा शेवटता आंतरराष्ट्रीय सामना असल्याने त्याला अशाप्रकारे भारतीय खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओवर अनेकज क्रिकेटप्रेमी कमेंट्स करत आहेत.



श्रीलंकेचा मीडियम फास्ट बोलर सुरंगा लकमलने श्रीलंकेसाठी अप्रतिम कामगिरी आजवर केली आहे. त्याने 70 टेस्ट सामन्यात 171 विकेट्स मिळवले आहेत. यावेळी एका डावात 4 वेळा त्याने पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स मिळवल्या आहेत. याशिवाय लकमलने 86 वनडे सामन्यान 109 विकेट्स घेतले आहेत. तर 11 टी20 सामन्यात त्याने 8 विकेट्स मिळवल्या आहेत.


असा पार पडला दुसरा सामना


भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) हा सामना पार पडला. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात श्रेयस अय्यरच्या 92 धावांच्या जोरावर 252 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघाला भारताने 109 धावांवर सर्वबाद केले. मॅथ्यूजच्या 43 धावा सोडता श्रीलंकेच्या संघाला खास कामगिरी करता आली नाही. भारताकडून बुमराहने सर्वाधिक विकेट घेतल्या. तर त्यानंतर दुसऱ्या डावात भारतानं अय्यरच्या 67, पंतच्या 50 आणि रोहितच्या 46 धावांच्या जोरावर 9 बाद 303 धावांवर डाव घोषित केला. ज्यामुळे श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी 446 धावांची गरज होती. पण भारताने श्रीलंकेला 208 धावांत सर्वबाद केल्याने भारत 238 धावांनी सामना जिंकला आहे. यावेळी आश्विनने 4, बुमहारने 3 आणि अक्षरने 2 तर जाडेजाने एक विकेट घेतली आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha