ICC Champions Trophy 2025 Latest Update : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरून वाद पेटला आहे. बीसीसीआयने आयसीसीला सांगितले आहे की टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला जाणार नाही. आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर पाकिस्तानी संघ मोठा निर्णय घेऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून थेट धमकी दिली आहे. भारतीय संघ पाकिस्तानात का येऊ इच्छित नाही, असा सवाल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला विचारला आहे. तसेच पाकिस्तान बोर्डाने या स्पर्धेचे यजमानपद काढून घेतल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले आहे.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांच्या देशात यावे अशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. पण बीसीसीआयने याला स्पष्ट नकार दिला आहे. भारताचे सामने पाकिस्तानबाहेर दुबईत व्हावेत, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. पण हायब्रीड मॉडेलसाठी पाकिस्तान अजिबात तयार नाही. त्यामुळे आयसीसी दक्षिण आफ्रिकेत चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करू शकते.
गतवर्षी आशिया कपचे आयोजनही पाकिस्तानने केले होते, पण त्यावेळीही टीम इंडियाने तेथे जाण्यास नकार दिला होता. मग त्यानंतर भारतीय संघाचे सामने दुबईत आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तानचे नुकसान झाले. आता पाकिस्तानला अशी परिस्थिती येऊ द्यायची नाही.
दरम्यान, पाकिस्तानच्या एका प्रतिष्ठित वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पीसीबी आयसीसीला स्पष्टपणे सांगेल की, भविष्यात 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसह कोणत्याही आयसीसी स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवू नये. जोपर्यंत भारत पाकिस्तान दौऱ्यासाठी राजी होत नाही तोपर्यंत पाकिस्तानला भारताविरुद्ध खेळायचे नाही.
2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्याचा अंतिम सामना 9 मार्चला होणार आहे. स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु पीसीबीने वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे पाठवला आहे.
हे ही वाचा -