India Playing 11 Vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या महिन्याच्या अखेरीस पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील कारण अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या त्याच्या संधींना धक्का बसला.
भारताला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 4-0 अशी जिंकावी लागेल. कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळू शकणार नसल्याचे मानले जात आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारताला सलामीच्या स्थानावर योग्य फलंदाजाचा शोध घ्यावा लागेल. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या दृष्टीने केएल राहुल हा एक पर्याय असू शकतो ज्याने यापूर्वी ऑस्ट्रेलियात सलामी दिली आहे. त्यामुळे कसे असेल पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे प्लेईंग इलेव्हन जाणून घेईया...
आता कर्णधार रोहित शर्मा त्यामुळे त्याची जागी जसप्रीत बुमराह कर्णधार असेल. सोमवारी सकाळी प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान, त्याने संकेत दिले की जर रोहित पहिल्या कसोटीत उपलब्ध नसेल तर केएल राहुल डावाची सुरुवात करेल.
नितीशकुमार रेड्डी यांचे पदार्पण निश्चित...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी पदार्पण करणार असल्याचे मानले जात आहे. नितीश ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ संघाचा भाग होता. फलंदाजीसोबतच तो गोलंदाजीही करू शकतो. या कारणामुळे त्याचा अंतिम अकरामध्ये समावेश होऊ शकतो.
पहिल्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करतील. यानंतर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर. यष्टिरक्षक ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळेल. यानंतर सहा, सात आणि आठ क्रमांकावर तीन अष्टपैलू असतील. यामध्ये नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा खेळण्याची शक्यता आहे. रविचंद्रन अश्विन बेंचवर बसू शकतो. त्यानंतर तीन वेगवान गोलंदाज. यामध्ये प्रसिद्ध कृष्णा मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहसोबत ॲक्शन करताना दिसणार आहे. अशा स्थितीत आकाशदीपला बाकावर बसावे लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (कर्णधार) आणि प्रसिद्ध कृष्णा.