Mohammed Shami : शमी भाऊ आला रे... वर्षभरानंतर 'या' दिवशी खेळणार पहिला सामना! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मिळणार संधी?
Mohammed Shami In Ranji Trophy : भारतीय संघाला 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळायची आहे. बीसीसीआयने याआधीच कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. तेव्हा तंदुरुस्त नसल्यामुळे मोहम्मद शमीला स्थान मिळाले नव्हते. पण आता भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेगवान गोलंदाज मोहम्मद शमी रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केल्यास ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याचा समावेश होऊ शकतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबर रोजी होणार आहे.
मोहम्मद शमीचा रणजी ट्रॉफीसाठी बंगाल संघात समावेश करण्यात आला आहे. बंगालचा सामना मध्य प्रदेश विरुद्ध होणार आहे. जी 13 नोव्हेंबरपासून (बुधवार) इंदूरमध्ये सुरू होत आहे.
मोहम्मद शमी दुखापतीमुळे 2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर बाहेर पडला आहे. 2023 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. शमीने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली होती.
शमीने एकहाती संघाला अंतिम फेरीत नेले आणि उपांत्य फेरीत 7 विकेट्स घेतल्या. मात्र अंतिम फेरीत त्याची जादू चालू शकली नाही. वर्ल्ड कपमध्ये त्याने एकूण 24 विकेट घेतल्या.
मोहम्मद शमीची गणना भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.
आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी 64 टेस्ट मॅचमध्ये 229 विकेट्स, 101 टेस्ट मॅचमध्ये 195 विकेट्स आणि 23 टी-20 इंटरनॅशनल मॅचमध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.