Ind vs Pak Asia Cup Rising : 42 चेंडूत 144 धावा ठोकणारा वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानशी भिडणार, भारत-पाक सामना कधी, कुठे पाहणार?
India vs Pakistan live Streaming Asia Cup Rising Marathi News : जितेश शर्माच्या नेतृत्वाखाली भारत अ संघाने आशिया कप राइजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत दमदार सुरुवात केली.

India vs Pakistan live Streaming Asia Cup Rising : जितेश शर्माच्या नेतृत्वाखाली भारत अ संघाने आशिया कप राइजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत दमदार सुरुवात केली. वैभव सूर्यवंशीच्या तुफानी खेळीच्या बळावर भारताने यूएईवर 148 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयामुळे भारतीय अ संघाला मौल्यवान असे दोन गुण मिळाले असून संघ अंकतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. आता भारताचा पुढील सामना रविवारी पाकिस्तान अ संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकत पुढील वाटचाल अधिक सोपी करण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल.
भारत आणि पाकिस्तान या सामन्यामधील भारताचा किशोरवयीन वैभव सूर्यवंशीवर सर्वाचं लक्ष असेल. केवळ 14 वर्षांचा हा तरुण फलंदाज मागील हंगामात राजस्थान रॉयल्सकडून झळकावलेल्या शतकामुळे जगभरात चर्चेत आला. त्याने अलीकडील सामन्यात UAE विरुद्ध केवळ 42 चेंडूत 144 धावा ठोकत 15 गगनचुंबी षटकारांची आतषबाजी केली. यासह तो वरिष्ठ स्तरावरील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी क्रिकेटमध्ये शतक करणारा भारताचा सर्वात लहान खेळाडू ठरला. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण संघात भीतीच वातावरण असणार हे मात्र निश्चित आहे.
Cricket’s biggest rivalry is back. Phir ek baar. 🔥
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 15, 2025
India A 🆚 Pakistan A 👉 Tomorrow, 8 PM, LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV. #SonySportsNetwork #SonyLIV pic.twitter.com/hgg3zj3F3T
भारत-पाक सामना कधी, कुठे पाहणार? सर्व माहिती (When & where to watch IND vs PAK Asia Cup Rising Stars)
आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 मध्ये 16 नोव्हेंबरला भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ संघ आमनेसामने येणार असून पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया कपच्या अंतिम फेरीत भारतीय वरिष्ठ संघाने पाकिस्तानवर तीनही सामन्यांत वर्चस्व गाजवले होते. ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी इमर्जिंग आशिया कप’चे नाव बदलून आता ‘आशिया कप रायझिंग स्टार्स’ असे करण्यात आले आहे.
वेस्ट एंड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दोहा स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे, जो रात्री 8 वाजता सुरू होईल. भारतातील अधिकृत प्रसारक सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आहे. भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ हा सामना Sony Sports Ten 1 SD आणि Sony Sports Ten 1 HD या चॅनेल्सवर थेट प्रसारित केला जाईल. तर लाईव्ह स्ट्रीमिंग Sony LIV अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ हेड-टू-हेड (Ind vs Pak Asia Cup Rising Stars)
हा स्पर्धा 2013 मध्ये सुरू झाली आणि पहिल्या चार आवृत्त्यांमध्ये (2013, 2017, 2018, 2019) U-23 संघांनी भाग घेतला. 2023 पासून A संघ या स्पर्धेत खेळू लागले. भारत आणि पाकिस्तानमध्ये हेड-टू-हेडमध्ये भारत 4-1 ने आघाडीवर असून पाकिस्तानचा एकमेव विजय 2019 मध्ये आला होता.
आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 — गट
- गट अ : श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान , हाँगकाँग (चीन)
- गट ब : भारत, पाकिस्तान, UAE, ओमान
हे ही वाचा -
शुभमन गिलला काय झालं? 9 विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; डॉक्टरांच्या रिपोर्टकडे सगळ्यांचे लक्ष, BCCIने काय सांगितलं?





















