India vs Pakistan Champions Trophy 2025 नवी दिल्ली: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे स्पर्धेच्या आयोजनाचा मान आहे. मात्र, भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा हायब्रीड मॉडेलनं आयोजित करावी असं म्हटलं. दुसरीकडे पाकिस्ताननं हायब्रीड मॉडेलला विरोध करत भारतानं पाकिस्तानला यावं अशी भूमिका घेतली. अखेर आयसीसीलाच यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. कारण, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासाठी आयसीसीनं पीसीबीला 590 कोटी रुपये दिले होते. भारताच्या बाजूनं इतर देश उभे राहिल्यानं हायब्रीड मॉडेलला पीसीबीला मान्यता द्यावी लागली. आयसीसीनं दिलेल्या निधीच्या आधारे पीसीबीनं तीन मैदानांची दुरुस्ती केली होती.  


लाहोरचं गद्दाफी स्टेडियम सर्वात जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद सुरु असताना तिकडे गद्दाफी स्टेडियमच्या दुरुस्ती आणि निर्माणाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे.प्रेक्षकांसाठीची आसनव्यवस्था पुन्हा तयार करण्यात आली आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर फायनल होणार आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच देखील इथंच प्रस्तावित होती. मात्र, हायब्रीड मॉडेलचा स्वीकार केला गेल्यानं भारताचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत होऊ शकतात.  त्यामुळं भारताच्या बाजूनं कौल देत आयसीसीनं हायब्रीड मॉडेल लागू केलं आहे. त्यामुळं भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीची लढत झाल्यास ती मॅच पाकिस्तानबाहेरच होऊ शकते. मात्र, याबाबत अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.


चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत भारताची भूमिका


भारत सरकारनं सुरक्षेच्या कारणावरुन भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला. दुसरीकडे पीसीबीनं देखील हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास नकार दिला होता. दोन्ही बाजूच्या ताठर भूमिकांमुळं आयसीसीवरील दबाव वाढू लागला होता. काही संघांनी थेट भारताची मागणी मान्य करुन  हायब्रीड मॉडेल लागू करावं, अशी भूमिका घेतली होती. दरम्यानच्या काळात दोन्ही क्रिकेट बोर्डामध्ये वाद वाढू लागला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर आयोजनाचा मान हातून निसटण्याचं संकट निर्माण झालं होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हायब्रीड मॉडेल स्वीकारल्यास अधिक रक्कम दिली जावी असा प्रस्ताव देत पीसीबीनं आयसीसीवरील दबाव वाढला.आयसीसीनं पीसीबीला अधिक पैसे द्यावेत, अशी देखील मागणी करण्यात आली. भारतात आयसीसीची कोणतीही मॅच झाली तर पीसीबीसाठी हायब्रीड मॉडेलचा वापर करावा, अशी विनंती देखील पीसीबीनं केली होती. मात्र, बीसीसीआयनं फेटाळून लावली.आता आयसीसीची बैठक 5 डिसेंबरला होणार आहे.  


इतर बातम्या :


6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्यकुमार यादवचीही बॅट तळपली