IND vs PAK Asia Cup 2025 : पाकिस्तानसोबतच्या सामन्याबाबत बीसीसीआयचे मोठे अपडेट, सामना होणार की नाही? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप 2025ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होत आहे. यंदाही भारत–पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत.

IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप 2025ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये होत आहे. यंदाही भारत–पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. हा हाय-वोल्टेज सामना 14 सप्टेंबरला दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी आता यावर भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, भारत–पाकिस्तान सामन्यासंदर्भात बीसीसीआय केंद्र सरकारच्या धोरणाचे पूर्ण पालन करते आणि त्यात बोर्डाला कोणतीही अडचण नाही.
The Men in Blue get in the groove! 🤸♂️
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 5, 2025
📸 Team India’s first practice session ahead of the #DPWorldAsiaCup2025#ACC pic.twitter.com/OuD4eu6pHW
सैकिया यांनी स्पष्ट केला बोर्डाचा दृष्टिकोन
पीटीआयला दिलेल्या खास मुलाखतीत सैकिया म्हणाले, “पाकिस्तानविरुद्ध सामन्याबाबत बीसीसीआयची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे. आम्ही केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी आहोत. सरकारने आखून दिलेले धोरण आम्हाला पाळायचे आहे आणि त्यात कुठलीही अडचण नाही.”
गिलच्या कर्णधारपदाबाबत मौन
शुभमन गिलला तिन्ही स्वरूपांत कर्णधारपद देण्याच्या शक्यतेवर विचारले असता सैकिया यांनी थेट उत्तर देणे टाळले. त्यांनी सांगितले की, हा योग्य काळ नाही. कोणत्याही खेळाडूच्या भविष्यासंदर्भात घाईघाईने मत व्यक्त करू नये.
The wait is over. 😍
— Star Sports (@StarSportsIndia) September 5, 2025
Team India is coming in hot for Men's Asia Cup 2025!
[ Men's Asia Cup 2025, Indian Cricket Team, Hardik Pandya, Suryakumar Yadav ] pic.twitter.com/VT6d5h8PZp
महिला वर्ल्ड कपबद्दल विश्वास
30 सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंका येथे महिला वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी सैकिया यांनी भारतीय महिला संघावर विश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “मागील दोन वर्षांपासून संघ उत्तम खेळतो आहे. अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही महिलांनी दमदार कामगिरी केली होती.” सैकिया यांच्या मते, खेळाडू विशाखापट्टणम येथे सतत सराव करत आहेत आणि गेल्या 6-7 महिन्यांपासून तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.
प्रेक्षकांसाठी स्वस्त तिकीट
महिला वर्ल्ड कप अधिक लोकप्रिय व्हावा म्हणून बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. सामन्यांचे तिकीट केवळ 100 रुपये ठेवण्यात आले आहे, जेणेकरून जास्तीत जास्त प्रेक्षक स्टेडियममध्ये येऊन महिला क्रिकेटला प्रोत्साहन देतील. सैकिया म्हणाले की, “यामागचा उद्देश हा आहे की महिला क्रिकेट अधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि खेळाडूंना खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये खेळण्याचा उत्साह मिळावा.”
हे ही वाचा -
Asia Cup पूर्वी हार्दिक पांड्याचा नवा लूक जोरदार चर्चेत, टीम इंडियाच्या ऑलराऊंडरचे फोटो व्हायरल





















