India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरु पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला आणि अखेरचा सामना भारताने प्रथम फलंदाजी करतच जिंकला होता. दोन्ही सामने भारताने तगड्या फरकाने जिंकले होते, त्यामुळे भारताची फलंदाजी सध्या कमाल फॉर्मात असल्याने भारताने हा निर्णय़ घेतला असावा.

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यातील संघातमध्ये काही बदल केले आहेत. हार्दिक पांड्या पुन्हा एकदा संघात परतला आहे. तसंच शार्दूलही प्लेईंग 11 मध्ये असून ईशान किशन आणि सूर्यकुमारही संघात आहेत. एकंदरीत भारतीय संघ पाहता तगडी फलंदाजी असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे आजही एक मोठी धावसंख्या भारत उभारु शकतो पण सोबतच न्यूझीलंडही कमाल फॉर्मात असल्याने एक रंगतदार सामना पाहायला मिळू शकतो.

कसे आहेत दोन्ही संघ?

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

न्यूझीलंड - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सॅंटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांचं वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 जानेवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारी शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर
तिसरा एकदिवसीय सामना 24 जानेवारी  होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर

हे देखील वाचा-