मुंबई : सध्या न्यूझीलंड क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर (India vs New Zealand) आला आहे. आधी तीन टी20 सामने खेळवण्यात आले असून आता कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात (Kanpur Test) खेळवला जात आहे. सामना अत्यंत चुरशीत सुरु असतानाच दुसऱ्या सामन्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारत-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात (Wankhede Stadium) खेळवला जाणार आहे. क्रिकेटचं सर्वाधिक वेड असणाऱ्या मुंबईत हा सामना असताना प्रेक्षकांना सामना पाहायची परवानगी मिळणार का? हा सर्वात मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर नुकतचं समोर आलं आहे.


आरोग्य शासनाने नव्याने दिलेल्या सूचनांनुसार 25 टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी मैदानात परवानगी मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. नुकत्याच याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण एकीकडे दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा नवा कोरोना व्हेरियंट जन्माला आल्याने मुंबई महापालिकाही नव्या उपाययोजना करत आहे. त्यामुळे सामन्याच्या दिवशीच नेमकं किती प्रेक्षकांना परवानगी मिळणार? हे कळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.


मुंबई महापालिका सज्ज


आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने (omicron variant) जगभरात खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश सतर्क झाले असून कोरोनाच्या या नव्या वेरियंटचा संसर्ग होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही सतर्क झाले असून विषाणूच्या या नव्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजन कण्यासाठी आज मुंबई महापालिका प्रशासनाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. 


व्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरता काही महत्वाची पावलं उचलण्याबाबत चर्चा होणार आहे.  परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर मुंबई महापालिका प्रशासनाकडून बारीक नजर ठेवली जाण्यावर भर दिला जाणार आहे. आज संध्याकाळी 5.30 वाजता ऑनलाईन पद्धतीनं महापालिका आयुक्तही बैठक घेणार आहे. या बैठकील सर्व कोविड हॉस्पिटलचे डीन, टास्क फोर्स सदस्य, अतिरीक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर,  आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहे. 


हे ही वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha