India vs New Zealand 3rd T20I: न्यूझीलंडविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डनवर (Eden Garden) खेळण्यात आलेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) इतिहास रचलाय. रोहित शर्मानं आज न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात तीन षटकार मारले. या षटकारांसह रोहितनं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 150 षटकारांचा टप्पा गाठण्याचा विक्रम त्याच्या नावावर केलाय. रोहित अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरलाय. तर, पहिला भारतीय फलंदाज बनलाय. या यादीत न्यूझीलंडचा तडाखेबाज फलंदाज मार्टिल गप्टिल अव्वल स्थानी आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून 150 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरलाय. त्यानं हा पराक्रम 119 सामन्यांच्या 111 डावांमध्ये केलाय. भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटच्या नावावर आतापर्यंत एकूण 91 षटकारांची नोंद आहे. रोहित शर्मा जागतिक स्तरावर 150 षटकार पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरलाय. तर, या यादीत अव्वल स्थानी असलेल्या मार्टिल गप्टिलनं टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 161 षटकार मारले आहेत.
विराटचाही विक्रम मोडला
रोहित शर्मानं आज न्यूझीलंडविरुद्ध 56 धावांची खेळी केलीय. या अर्धशतकी खेळीसह रोहित टी-20 आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरलाय. रोहित शर्मानं 30 सामन्यात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या. या पराक्रमासह रोहित रोहित शर्मानं विराट कोहलीलाही मागे टाकलंय. विराट कोहलीनं टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 29 सामन्यात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या. या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं 25 वेळा अशी कामगिरी केलीय. तर, ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वार्नर 22 अर्धशतकांसह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- IND vs NZ 3rd T20: भारत-न्यूझीलंड सामन्यापूर्वी मैदानाबाहेर तिकिटांचा काळाबाजार, 11 जणांना अटक
- IND vs NZ 3rd T20: टी-20 क्रिकेटमध्ये रोहित रचणार इतिहास? विराटचा विक्रम मोडण्यापासून 87 धावा दूरMajha Katta: ...अन् ब्राव्होची हरवलेली बॅट सचिननं एका
- क्षणात ओळखली! मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममधील हा भन्नाट किस्सा नक्की वाचा