Ind vs Nz 1st Test Day-3 : भारताचा पलटवार! दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर कोहली आऊट, जाणून घ्या तिसऱ्या दिवशी काय घडलं?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरू येथे सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात केवळ 46 धावा केल्या.
तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर भारताने सेट फलंदाज विराट कोहलीची विकेट गमावली आहे. कोहली आणि सरफराज खान यांच्यात चांगली भागीदारी सुरू होती जी ग्लेन फिलिप्सने कोहलीला बाद करून तोडली. त्यामुळे दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 3 बाद 231 धावा केल्या होत्या. भारत अजूनही न्यूझीलंडपासून 125 धावांनी पिछाडीवर आहे. सरफराज खान सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 78 चेंडूत 70 धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे.
सरफराज खाननंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही अर्धशतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 31 वे अर्धशतक आहे. अशाप्रकारे कोहली आणि सर्फराज यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारीही पूर्ण झाली आहे. सरफराज 56 आणि कोहलीने 51 धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे. भारत मात्र अजूनही न्यूझीलंडपेक्षा 160 धावांनी पिछाडीवर आहे.
सरफराज खानने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. सरफराजने 42 चेंडूत अर्धशतक केले, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक आहे. कोहलीही दुसऱ्या टोकाला सरफराजसोबत चांगला खेळत आहे. आतापर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी झाली आहे.
दोन विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहली आणि सरफराज खान यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यशस्वी आणि कर्णधार रोहितच्या विकेट्स गमावल्यानंतर कोहली आणि सरफराजने शानदार फलंदाजी करत आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये आतापर्यंत 76 धावांची भागीदारी झाली आहे.
टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात केली आहे. दोघांमध्ये 50 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. भारताने 13 षटकात बिनबाद 51 धावा केल्या असून न्यूझीलंडच्या 305 धावांनी पिछाडीवर आहे.
भारताचा दुसरा डाव सुरू झाला आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल क्रीजवर आहेत. टीम इंडियाने 29 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडने भारतीय संघावर 327 धावांची आघाडी मिळवली आहे.
न्यूझीलंडचा पहिला डाव 402 धावांवर संपला. भारताने पहिल्या डावात 46 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे किवी संघाने पहिल्या डावात 356 धावांची आघाडी मिळवली. रचिन रवींद्रने 134 धावांची शानदार खेळी केली. रचिनने 157 चेंडूंच्या खेळीत 13 चौकार आणि चार षटकार मारले.
दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होताच भारताने किवीजला आठवा धक्का दिला आहे. सिराजने टीम साऊथीला आपला शिकार बनवले. तो 65 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. एजाज पटेल 10 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी रचिन रवींद्र क्रीझवर आहे.
दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होताच भारताने किवीजला आठवा धक्का दिला आहे. सिराजने टीम साऊथीला आपला शिकार बनवले. तो 65 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. एजाज पटेल 10 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी रचिन रवींद्र क्रीझवर आहे.
दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होताच भारताने किवीजला आठवा धक्का दिला आहे. सिराजने टीम साऊथीला आपला शिकार बनवले. तो 65 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. एजाज पटेल 10 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी रचिन रवींद्र क्रीझवर आहे.
दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होताच भारताने किवीजला आठवा धक्का दिला आहे. सिराजने टीम साऊथीला आपला शिकार बनवले. तो 65 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. एजाज पटेल 10 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी रचिन रवींद्र क्रीझवर आहे.
तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने पहिल्या डावात सात गडी गमावून 345 धावा केल्या आहेत. रचिन रवींद्रने कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. तो 104 धावांवर फलंदाजी करत असून टीम साऊदी 49 धावांवर खेळत आहे. या दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडची आघाडी सध्या 299 धावांची आहे. सौदी त्याच्या सातव्या कसोटी अर्धशतकापासून एक धाव दूर आहे. रचिनने आतापर्यंतच्या खेळीत 11 चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. त्याचबरोबर सौदीने तीन चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. 233 धावांवर किवी संघाची सातवी विकेट पडली होती. यानंतर सौदी आणि रचिनने आक्रमक फलंदाजी केली. न्यूझीलंडने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 31 षटकांत 165 धावा केल्या आणि चार विकेट गमावल्या. आज किवी संघाने 5.32 च्या धावगतीने धावा केल्या आहेत.
रचिन रवींद्रने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले आहे. न्यूझीलंडने सात गड्यांच्या मोबदल्यात 335 धावा केल्या आहेत. रचिन आणि टीम साऊदी यांच्यात शतकी भागीदारीही झाली आहे. सध्या रचिन 104 आणि साऊथी 39 धावांवर खेळत आहेत. शेवटच्या तीन षटकात 48 धावा झाल्या आहेत. हे दोन्ही खेळाडू चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत आहेत.
न्यूझीलंडला 233 धावांवर सातवा धक्का बसला. रवींद्र जडेजाने मॅट हेन्रीला क्लीन बोल्ड केले. त्याला आठ धावा करता आल्या. बाद होण्यापूर्वी हेन्रीने जडेजाच्या लागोपाठ दोन चेंडूंवर दोन चौकार मारले होते. यानंतर जडेजाने तिसऱ्या चेंडूवर त्याला बोल्ड केले. सध्या टीम साऊदी आणि रचिन रवींद्र क्रीजवर आहेत. किवीजची आघाडी 188 धावांवर पोहोचली आहे.
तिसऱ्या दिवशी सिराज, बुमराह, जडेजाचा कहरचा कहर पाहिला मिळत आहे. न्यूझीलंडला 223 धावांवर सहावा धक्का बसला. रवींद्र जडेजाने ग्लेन फिलिप्सला क्लीन बोल्ड केले. त्याला 14 धावा करता आल्या. किवी संघाला आजचा हा तिसरा धक्का आहे. सध्या रचिन रवींद्र आणि मॅट हेन्री क्रीजवर आहेत. न्यूझीलंडची आघाडी 175+ धावांची आहे
न्यूझीलंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. 204 धावांवर न्यूझीलंडला पाचवा आणि दिवसाचा दुसरा धक्का बसला. जसप्रीत बुमराहने टॉम ब्लंडेलला आऊट केले. त्याला पाच धावा करता आल्या. सध्या रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स क्रीजवर आहेत. याआधी सिराजने डॅरिल मिशेलला (18) पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. न्यूझीलंडची आघाडी सध्या 158 धावांची आहे.
डॅरिल मिशेलच्या रूपाने न्यूझीलंडला तिसऱ्या दिवशी पहिला धक्का बसला. सिराजने त्याला आऊट केले. मिचेलने 18 धावा केल्या. त्याने रचिनसोबत 39 धावांची भागीदारी केली. सध्या टॉम ब्लंडेल क्रीझवर आला आहे. रचिन रवींद्र 31 धावा करून क्रीजवर आहे. न्यूझीलंडची आघाडी 145+ धावांची आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर रचिन रवींद्रने चौकार ठोकला. किवी संघाची आघाडी 135 धावांपेक्षा जास्त झाली आहे. सध्या रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल क्रीजवर आहेत.
पार्श्वभूमी
India vs New Zealand 1st Test day-3 Live : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे सुरू आहे. पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली आणि ते अवघ्या 46 धावांत गारद झाले. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत मॅट हेन्रीने 5 तर विल्यम ओ'रुर्कने 4 विकेट घेतल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा केल्या.
बंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 3 बाद 231 धावा आहे. आता पहिल्या डावाच्या आधारे भारत न्यूझीलंडपेक्षा 125 धावांनी मागे आहे. तिसऱ्या दिवशी भारताकडून विराट कोहली आणि सरफराज खान यांनी शानदार फलंदाजी केली. दोन्ही खेळाडूंमध्ये 136 धावांची भागीदारी झाली. विराट कोहलीने 102 चेंडूत 68 धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीला बाद करून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. त्याच वेळी, सरफराज खान 78 चेंडूत 70 धावा करून क्रीजवर आहे.
याआधी भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांच्यात 72 धावांची भागीदारी झाली होती. यशस्वी जैस्वाल 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यशस्वी जैस्वालला एजाज पटेलने बाद केले. यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा 63 चेंडूत 52 धावा करून बाद झाला. रोहित शर्मा एजाज पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. न्यूझीलंडकडून आतापर्यंत एजाज पटेलने 2 बळी घेतले आहेत. तर ग्लेन फिलिप्सने विराट कोहलीची महत्त्वाची विकेट घेतली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -