क्रिकेटचा सामना सुरु असताना अनेक क्रिकेटवेडे आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक अतरंगी गोष्टी मैदानात करताना दिसत असतात. कोणी पोस्टर, तर कोणी घोषणाबाजी करत असते. पण भिवंडीमध्ये अजब घटना घडली. एका क्रिकेट वेड्यानं फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजावर 500 च्या नोटा भिरकवल्याचा प्रकार पाहायला मिळाला. कल्याण-भिवंडी मार्गावरील कोनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात घडली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही 70 - 70 क्रिकेट स्पर्धा कोनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आली होती. ही क्रिकेट स्पर्धा भाजपचे कल्याण शहर अध्यक्ष वरून पाटील यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धामध्ये अनेक संघानी सहभाग घेतला होता, विशेष म्हणजे या क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी तुफानी फटेकबाजी करत केले होत.
त्यातच शेवट्याचा दिवशी दोन संघामध्ये चुरशीचा सामना रंगला होता, ज्यामध्ये पवन नावाच्या फलंदाजाची मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि 35 धावा केल्या. त्याची फलंदाजी पाहून प्रेषक विकास भोईर यांनी मैदानात धाव घेऊन चक्क पवनच्या अंगावर नोटांचा बंडल भिरकावत अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला.
नोटांचा पाऊस पाहून काही प्रेक्षकही या नोटा गोळा करण्यासाठी मैदानात धावले. त्यानंतर सर्व नोटा गोळाकरून त्या पवन याला देण्यात आल्या. मात्र दुसरीकडे भारतीय पैशांचा भर मैदानात अपमान केल्याची टीका काही नेटकऱ्यांमधून होत आहे.
हे ही वाचा -