(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs ENG 2nd T20 : भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी20 साठी काही तास शिल्लक, हेड टू हेड रेकॉर्डपासून ते संभाव्य अंतिम 11, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
IND vs ENG : भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा टी20 सामना बर्मिंगहममधील एजबेस्टन मैदानात रंगणार असून मालिकाविजयासाठी भारताला आजचा सामना महत्त्वाचा आहे.
IND vs ENG Edgbaston T20 : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. इंग्लंडमधील बर्मिंगहमच्या एजबेस्टन (Edgbaston) मैदानात पार पडणाऱ्या या सामन्याला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक झाल्यानंतर 7 वाजता सामना सुरु होणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना असून पहिला सामना भारताने जिंकल्यामुळे आजचा सामना भारत जिंकल्यास मालिकेत भारत 2-1 ची विजयी आघाडी घेईल, तर या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड हेड टू हेड (IND vs ENG Head To Head), मैदानाची स्थिती, संभाव्य अंतिम 11 या साऱ्या गोष्टींवर एक नजर फिरवू...
आतापर्यंत भारत विरुद्ध इंग्लंड
भारतीय संघाने पहिल्या टी20 सामन्यात विजय मिळवला आहे. इंग्लंडविरुद्धचं भारतीय संघाचं टी20 मधील रेकॉर्ड चांगला आहे. दोन्ही संघामध्ये आतापर्यंत 20 टी20 सामने खेळवले गेले आहेत. ज्यातील 11 सामने भारताने जिंकले असून 9 सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. यामुळेच भारत सध्यातरी इंग्लंडपेक्षा पुढे आहे. दरम्यान आजचा सामना जिंकल्यास भारत आपली आघाडी वाढवेल तसंच सध्या सुरु असलेल्या मालिकेतही विजयी आघाडी घेईल.
एजबेस्टनवर विजय अवघड
आज सामना होणाऱ्या एजबेस्टनच्या मैदानात भारताला एकही विजय मिळवता आला नसून नुकताच कसोटी सामन्यातही पराभव पत्करावा लागला. याठिकाणी अखेरचा भारत विरुद्ध इंग्लंड सामना 2014 मध्ये झाला होता. ज्यावेळी भारताकडून विराटने 66 धावांची एकहाती झुंज दिली होती. पण सामना मात्र इंग्लंडने 3 धावांनी जिंकला होता. दरम्यान इंग्लंडने याठिकाणी खेळलेल्या तीनही टी20 सामन्यात विजय मिळवला आहे.
कशी असू शकते दोन्ही संघाची अंतिम 11?
आज होणाऱ्या सामन्यात भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह संघात परतले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली हे सर्वजण आज मैदानात उतरु शकतात. त्यामुळे पहिल्या टी20 खेळलेले काही युवा खेळाडू आज विश्रांती करु शकतात. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी असू शकते, यावर एक नजर फिरवूया...
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह
इंग्लंडचा संघ : जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), डेविड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, डेविड विली, मॅथ्यू पार्किंसन आणि रिचर्ड ग्लीसन
हे देखील वाचा-
- India vs West Indies 2022 : वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिकेत कोहली, शर्मा, पंत मैदानात उतरणार, समोर आली मोठी माहिती
- Watch Video : ...म्हणून भुवनेश्वर कुमार भारताचा 'स्विंगमास्टर', भुवीने बटलरची विकेट घेतलेली डिलेव्हरी पाहिलीत का?
- IND vs ENG: दुसऱ्या टी-20 मध्ये कोहली, पंत, बुमराह आणि जाडेजाचं पुनरागमन; कोणत्या खेळाडूंचा पत्ता होणार कट?