IND vs BAN 3rd ODI: बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघ दुखापतींशी झुंज देतोय. पहिल्या एकदिवसीय सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या भारताचा युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला (Kuldeep Sen) पाठीच्या दुखापतीमुळं दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकावं लागलं. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) फिल्डिंग करताना  दुसऱ्याच षटकात अंगठ्याला जबर मार लागला. ज्यामुळं त्याला ताबडतोब मैदान सोडावं लागलं. तसेच त्याच्यावर योग्य उपचारही करण्यात आले. याच सामन्यात युवा वेगवान गोलंदाज दीपक चाहरला (Deepak Chahar) दुखापत झाली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दिपक चाहरनं फक्त तीन षटकं गोलंदाजी केली. यानंतर बीसीसीआयनं (BCCI) त्याच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून दीपक चाहर एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्याची घोषणा केली. याचदरम्यान, अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवचा (Kupdeep Yadav) तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात समावेश केल्याची माहिती समोर येत आहे.


दरम्यान कुलदीप सेननं पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर पाठीच्या दुखापतीची समस्या जाणवत असल्याची आल्याची तक्रार केली होती. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकानं त्याची तपासणी केली.तसेच त्याला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. कुलदीपला स्ट्रेस इंजरीचं निदान झाले असून तो मालिकेतून बाहेर पडला आहे. याचबरोबर दीपक चहरला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान डाव्या हाताच्या दुखापतीचा त्रास झाला. ज्यामुळं त्यालाही एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर पडला. कुलदीप आणि दीपक दोघेही आता त्यांच्या दुखापतींच्या पुढील व्यवस्थापनासाठी एनसीएकडे अहवाल देतील. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं कुलदीप यादवचा तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात समावेश केलाय.


ट्वीट-







भारतानं एकदिवसीय मालिका गमावली
नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघानं महेंदी हसन शतकी आणि महमूदुल्लाहच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकात सात विकेट्स गमावून भारतासमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित 50 षटकांत 266 धावापर्यंतच मजल मारू शकला. भारतानं हा सामना पाच धावांनी गमावला. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. अखेरच्या काही षटकात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दुखापतग्रस्त रोहित शर्मानं सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. 


तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघ:
केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.



हे देखील वाचा-