India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने 10 विकेट्स गमावत 233 धावा केल्या. यानंतर भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या 3 षटकामध्येच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जैस्वालने (Yashashwi Jaiswal) 51 धावा केल्या. सध्या भारतीय संघाने 1 विकेट गमावत 121 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे केवळ 12 षटकांत भारतीय संघाने या 121 धावा केल्या आहेत.
डावाच्या पहिल्या षटकामध्ये यशस्वी जैस्वालने (Yashashwi Jaiswal) तीन चौकार लगावले. यानंतर दुसऱ्या षटकात रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्या दोन चेंडूत खणखणीत षटकार टोलावले. पहिल्या 5 षटकांमध्ये भारतीय सलामीवीरांचा आक्रमक फलंदाजी पाहून बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोच्या चेहऱ्याचा रंग उडाला. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्माने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडल्यानंतर शांतो थेट अम्पायरकडे गेला आणि त्यांना चेंडू तपासण्याची विनंती केली. शांतोच्या मागणीवरुन अम्पायरने चेंडू तपासला तेव्हा तो व्यवस्थित असल्याचे दिसले.
रोहित बाद, यशस्वी दमदार अर्धशतक-
यशस्वी जैस्वालने स्फोटक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आहे. यशस्वीने 49 चेंडूत 72 धावा केल्यानंतर खेळत आहे. शुभमन गिल 30 धावा करून खेळत आहे. भारताची पहिली विकेट रोहित शर्माच्या रूपाने पडली. रोहित 11 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. त्याने एक चौकार आणि तीन षटकार लगावले.
सामना कसा राहिला?
27 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसामुळे खेळ एक तास उशिराने सुरू झाला. त्यानंतर लंच ब्रेकनंतर सामना पावसामुळे थांबवण्यात आला. यानंतर पावसामुळे चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या दिवशीही असेच दृश्य पाहायला मिळाले. तिसरा दिवसही एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. आज सामन्यातील चौथा दिवस बांगलादेशकडून मोमीनूल हकने दमदार शतक ठोकले. मोमीनूल हकने नाबाद 107 धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स पटकावल्या. मोहम्मद सिराजने 2, रवीचंद्रन अश्विनने 2, आकाश दीपने 2 विकेट्स घेतल्या. तसेच रवींद्र जडेजाला 1 विकेट मिळाली. दरम्यान, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला होता. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला.
संबंधित बातमी:
Ind vs Ban: रोहित शर्माचा अफलातून झेल; स्वत:लाही बसला नाही विश्वास, मैदानातील सर्व अवाक, Video