India vs Bangladesh U19 Asia Cup 2024 final : एसीसी पुरुष अंडर-19 आशिया कप स्पर्धेच्या फायनलसाठी दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. भारतीय संघाने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. मात्र, फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल, अशी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण बांगलादेशने पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाच्या सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे. बांगलादेशने गेल्या वेळी 2023 मध्ये यूएईचा पराभव करून अंडर 19 आशिया कप जिंकला होता. आता सलग दुसऱ्यांदा हे जेतेपद पटकावण्याचा त्याचा प्रयत्न असेल.




वैभव सूर्यवंशीचा कहर


13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी हा भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्याचा हिरो होता, जो सलग दुसऱ्या सामन्यात चर्चेत राहिला. दुसऱ्या उपांत्य फेरीत त्याच्या झंझावाती खेळीमुळे भारताने श्रीलंकेचा 170 चेंडू राखून सात गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली. डावखुऱ्या फलंदाजाने अवघ्या 36 चेंडूत 67 धावांची तुफानी खेळी केली. सूर्यवंशीने श्रीलंकेविरुद्धचे अर्धशतक अवघ्या 24 चेंडूंमध्ये पूर्ण केले, ज्यात त्याने सहा चौकार आणि पाच षटकार ठोकले. 




अलीकडेच वैभवला राजस्थान रॉयल्सने 1.1 कोटी रुपयांना विकत घेतले, ज्यामुळे तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सामील होणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला पहिल्या 47 षटकांत 173 धावांवर रोखले आणि त्यानंतर 3 गडी गमावून 23.2 षटकांत 174 धावांचे लक्ष्य गाठले.


कधी, कुठे आणि कसा पाहायचा भारत विरुद्ध बांगलादेश आशिया कपचा फायनल सामना (When, Where, Which India vs Bangladesh U19 Asia Cup 2024 final)


एसीसी पुरुष अंडर-19 आशिया कप स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना 8 डिसेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार विजेतेपदाचा सामना सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल, तर थेट प्रवाह सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. अंतिम फेरीत भारतीय संघ 9व्यांदा विजेतेपदावर कब्जा करण्यासाठी सर्वांच्या नजरा असतील.


हे ही वाचा -


Siraj : कानून के हात सिर्फ लंबे नही होते... स्पीडभी बढाते है, सिराजच्या बॉलिंगवेळी स्पीडगनवर 181.6 Kmph नोंद, सगळेच आश्चर्यचकित


IND vs AUS : दुसऱ्या कसोटीत भारत बॅकफूटवर, टीम इंडियाला आणखी एक धक्का बसणार, ICC सिराजला शिक्षा देण्याची शक्यता, कारण...