ॲडिलेड :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतानं 180 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघानं पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 1 बाद 86 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांना आज यश मिळालं नाही. मोहम्मद सिराज मात्र वेगळ्या कारणानं चर्चेत राहिला. पहिलं कारण म्हणजे मार्नस लाबूशनेच्या दिशेनं फेकलेला बॉल आणि दुसरं कारण म्हणजे त्यानंतर टाकलेल्या बॉलचा वेग हे होय. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 25 व्या ओव्हरमध्ये टाकलेल्या बॉलचा वेग 181.6 किमी/ प्रतितास इतका स्पीड गननं दाखवला. हे स्क्रीनवर पाहताच नेटकरी देखील सक्रीय झाले. त्यांनी मग मिम्स आणि मजेशीर पोस्ट करण्यास सुरुवात केली.
स्पीड गननं वेग नोंदवण्यात चूक केल्यानं मोहम्मद सिराजनं टाकलेल्या बॉलचा वेग 181.6 किमी/ प्रतितास नोंदवला गेला. तांत्रिक अडचण आल्यानं हा वेग नोंदवला गेला होता. त्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती देखील करण्यात आली. मात्र याबाबतचे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल होत असून एका नेटकऱ्यानं कानून के हात सिर्फ लंबे नही होते, कभी कभी अनएक्सपेटेड तरीखेसे स्पीड बी बढाते है, अशी पोस्ट केली.
सर्वाधिक वेगवान गोलंदाजीचा विक्रम शोएब अख्तरच्या नावावर
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या नावावर सर्वाधिक वेगवान गोंलदाजीचा विक्रम आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेतील 2003 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध 161.3 किमी/प्रतितास वेगानं गोलंदाजी केली होती. त्यानंतर यावेगानं कोणी देखील गोलंदाजी केलेली नाही.
भारताच्या गोलंदाजांचा विकेट साठी संघर्ष
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांना 20 विकेट काढण्यात यश आलं होतं. आज पहिल्या दिवशी खेळ संपला तेव्हा भारताला ऑस्ट्रेलियाची केवळ 1 विकेट काढता आली होती. ती देखील जसप्रीत बुमराहला मिळाली. मोहम्मद सिराज, हर्षित राणा यांना विकेट काढता आली नाही.
पहिल्या दिवशी काय घडलं?
भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली हे चांगली खेळी करु शकले नाहीत.तर, के.एल. राहुल, शुभमन गिल, रिषभ पंत, नितीशकुमार रेड्डी, आर. अश्विन हे चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मिशेल स्टार्कनं भारताच्या 6 विकेट घेतल्या. तर, भारताकडून केवळ जसप्रीत बुमराह एक विकेट काढण्यात यशस्वी ठरला.
इतर बातम्या :
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा