IPL 2025 Auction Rishabh Pant on RCB : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दीर्घकाळापासून दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे. पंत आयपीएल 2024 मध्ये दिल्लीचे कर्णधार होता. मात्र, पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. दरम्यान, पंतबद्दल मोठ्या प्रमाणात बातम्या येत आहे की, तो पुढील हंगामात म्हणजेच 2025च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसणार आहे. आता पंतने या अफवांवर मौन सोडले आहे.


सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट व्हायरल झाली होती, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, ऋषभ पंतने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) मध्ये फाफ डू प्लेसिसची जागा घेण्यासाठी आरसीबीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला आहे.


ऋषभ पंतने आरसीबीचा कर्णधार बनण्याची ऑफर दिल्याचा दावा सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे, परंतु आरसीबी व्यवस्थापनाने त्याला नकार दिला आहे. यासोबतच अशीही अफवा आहे की टीम इंडियामध्ये सुरू असलेल्या राजकारणामुळे विराट कोहलीलाही पंतला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग बनवायचे नाही.


आता टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने X च्या या पोस्टवर मौन सोडले आहे आणि त्याला उत्तर दिले आहे. पंतने लिहिले की, "ही फेक न्यूज आहे. तुम्ही लोक सोशल मीडियावर फेक न्यूज का पसरवत आहात. हे चुकीचे आहे, थोडेसे समजदार व्हा. विनाकारण अविश्वासाचे वातावरण निर्माण करू नका. ही पहिली वेळ नाही आणि मला माहित आहे. पुढे पण असे होते राहिल. पण मला माझा आवाज उठवावा लागला, सोशल मीडियाची पातळी दररोज घसरत आहे. हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे फक्त तुमच्यासाठी नाही, तर ते अनेक लोकांसाठी आहे जे खोट्या बातम्या पसरवत आहेत.






आत्तापर्यंत ऋषभ पंत आयपीएलमध्ये फक्त दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने पंतला कर्णधार बनवले. आयपीएल 2024 मध्येही तो त्याच संघाचा भाग होता, परंतु पंत आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स सोडू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, आता दिल्ली कॅपिटल्स पंतला यावेळेसही सामील करते की अन्य काही संघ त्याला विकत घेतात हे पाहायचे आहे.


ऋषभ पंत बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळतोय....


आजकाल ऋषभ पंत बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसत आहे. या मालिकेद्वारे पंतने तब्बल 2 वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि पहिल्याच सामन्यात शतक झळकावले.


हे ही वाचा - 


IPL 2025 : लिलावाआधी चेन्नईच्या ताफ्यात मोठी खळबळ; 10 वर्षांनी धोनीच्या लाडक्या 'अण्णा'ची CSKमध्ये होणार एन्ट्री?