Ind vs Ban T20: आज भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात मालिकेतील दुसरा टी-20 सामना होणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. 


भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील आजचा दुसरा टी-20 सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाने पहिला टी-20 सामना 7 विकेट्सने जिंकला होता. या सामन्यात अर्शदीप सिंगला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. तर भारताकडून वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यामुळे दुसऱ्या टी-20 सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल, भारत आणि बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असेल, जाणून घ्या...






खेळपट्टी कशी असेल?


दिल्लीतील अरुण जेटली मैदानाची खेळपट्टी नेहमी फलंदाजीसाठी योग्य असल्याचे पाहायला मिळाले आहे. या मैदानावर मोठी धावसंख्या होताना अनेकदा दिसले आहे. मैदानाच्या चौकार लहान असल्याने चौकार-षटकार मारणे सोपे जाते. आयपीएल 2024 मध्ये या मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या 5 सामन्यांपैकी 8 डावांमध्ये 200 किंवा त्याहून अधिक धावा झाल्या आहेत. दुसरीकडे, जसजसा सामना पुढे सरकतो, तसतशी फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीवरून मदत मिळू लागते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 13 सामन्यांत केवळ 4 वेळा विजय मिळवता आला आहे.


भारतीय संघात होईल बदल?


मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजीपासून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणापर्यंत सर्वच बाबतीत चांगली कामगिरी केली. मयंक यादव आणि नितीश कुमार यांनीही पदार्पणाच्या सामन्यात चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यातील कामगिरी पाहता टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करेल अशी शक्यता फारशी दिसत नाही. परंतु मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर काही वेगळा निर्णय देखील घेऊ शकतात. 


भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-


अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.


बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-


लिटन दास, परवेझ हुसेन, नजमुल शांतो, ताहिद ह्दोय, महमुदुल्ला, झेकर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.


संबंधित बातमी:


'कपिल शर्मा शो'मध्ये दिले संकेत, आता थेट जाहीर केलं; टीम इंडियाला टी-20 विश्वचषक जिंकवून देणारा खेळाडू होणार 'बाबा'