India vs Bangladesh 1st Test Live : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून (19 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कुलदीप यादवला भारतीय संघातून वगळण्यात आले असून त्याच्या जागी वेगवान गोलंदाज आकाश दीप खेळणार आहे.


नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, मला पण आधी गोलंदाजी करायची होती. ही आव्हानात्मक परिस्थिती असणार आहेत. आम्ही चांगली तयारी केली आहे. 10 कसोटी सामने बघितले तर प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो, पण आपल्या समोर जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करायचे असते.


पुढे तो म्हणाला की, आम्ही एका आठवड्यापूर्वी येथे आलो होतो, आम्ही कसोटीसाठी चांगली तयारी केली आहे. या सामन्यात तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाज खेळतील. बुमराह, आकाश दीप, सिराज, अश्विन आणि जडेजा.






भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी फॉर्मेटमध्ये 2000 मध्ये सामना सुरू झाला आणि तेव्हापासून या दोन संघांमध्ये एकूण 13 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे आणि भारताने 11 सामने जिंकले आहेत, तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत आणि एकाही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नाही. त्याचबरोबर बांगलादेशला अद्याप एकही विजय मिळालेला नाही.


पण, बांगलादेशने शेवटच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला घरच्या मैदानावर पराभूत केले आहे, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास खूप उंचावला आहे आणि संघाला आपली कामगिरी कायम ठेवायची आहे. हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 च्या शर्यतीत आहेत, त्यामुळे या मालिकेतील दोन्ही सामन्यांना खूप महत्त्व आहे.


पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन - 


भारत - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


बांगलादेश - शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.


हे ही वाचा -


Ind vs Ban 1st Test Live : बांगलादेशने जिंकली नाणेफेक; लाल मातीच्या खेळपट्टीत, रोहितने 3 वेगवान गोलंदाज अन् 2 फिरकीपटूंना दिली संधी