IND vs BAN, 1st ODI : भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. दरम्यान भारतीय संघाच्या अंतिम 11 चा विचार करता आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप सेन (Kuldeep Sen) याला भारतीय संघात एन्ट्री मिळाली आहे. आज तो आपला पहिला-वहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. याशिवाय एक मोठा बदल म्हटल्यास मेडिकल टीमच्या सल्ल्यानुसार स्टार विकेटकिपर ऋषभ पंत एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला आहे. तो थेट कसोटी सामन्यांत परतणार आहे.


आजच्या सामन्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहित शर्मा आणि शिखर धवन ही व्हिटेंज जोडी मैदानात परतणार आहे. या दोन्ही दिग्गजांनी सलामीला येत अनेक सामने गाजवले असून आज बऱ्याच काळानंतर पुन्हा दोघेही मैदानावर परतत आहेत. तर नेमका भारतीय संघ कसा आहे ते पाहूया...


अशी आहे टीम इंडिया?


रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन






बांगलादेश संघाचा विचार करता त्यांचा कर्णधार तामिम दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाल्यावर लिटन दास कर्णधार आहे. त्याच्या जोडीला अनामूल हक, नजमुल हुसेन शांतो हे वरच्या फळीत फलंदाजी करतील. तर अष्टपैलूी कामगिरी स्टार खेळाडू शाकिप अल् हसन निभावेल. मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला मधल्या फळीत असून अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, इबादोत हुसैन यांच्यावर गोलंदाजीची धुरा असेल.


बांगलादेशचे अंतिम 11 : लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, नजमुल हुसेन शांतो, शाकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), महमुदुल्ला, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, इबादोत हुसैन


हे देखील वाचा-